संगमनेरमध्ये बनावट नोटांची छपाई, पुणे गुप्तचर विभागाने ‘रजनीकांत’च्या आवळल्या मुसक्या…

  • Written By: Published:
संगमनेरमध्ये बनावट नोटांची छपाई, पुणे गुप्तचर विभागाने ‘रजनीकांत’च्या आवळल्या मुसक्या…

अहिल्यानगर – संगमनेर (Sangamner) शहराजवळच असलेल्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बनावट नोटांची (Fake Currecy) छपाई केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी थेट दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या (Delhi Intelligence Bureau) आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी (Sangamner Police) संयुक्त कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. रजनीकांत राहणे (Rajinikanth Rahane) असं ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.

बुऱ्हानगरमधील ‘ती’ कारवाई खुन्नसेपोटी, प्राजक्त तनपुरेंचा सत्ताधारी आमदारांवर थेट निशाणा 

याबाबत अधिक माहिती अशी, गुप्तचर विभागाला संगमनेरमधील गुंजाळवाडी परिसरात एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुण्याच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील काही बनावट नोटा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेरमध्ये आलेल्या गुप्तचर विभागाच्या चार अधिकाऱ्यांसह संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सनई-चौघडयांचे सूर, शेकडों प्रेक्षक अन् जिजाऊंच्या ओव्या, ‘रणरागिणी ताराराणी’ चा दिमाखात शुभारंभ! 

दरम्यान, छापा मारण्यात आलेल्या ठिकाणी काही मुद्देमालासह रजनीकांत राहणे हा आढळून आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या नोटा छापून चलनात कशा वापरल्या गेल्या, त्यासाठीचा कागद कुठून आणला यासंदर्भात त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीस चौकशीनंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती समोर येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube