मुंडे भावा-बहिणींच्या नात्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष संपल्याचं चित्र आहे. धनंजय मुंडे यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे येणाऱ्या लोकसभेसाठी प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आणि त्याची जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावा-बहिणीच्या राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. याच ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भजनी ठेक्याचा बाज असणारे एक रोमांचक उत्सवगीत आता खास रे टीव्ही (Khaas Re TV) घेऊन आले आहे. माझा प्राण, प्रभुराम !! मुखी नाम, बोला जय श्रीराम !! चला सामील होऊया रामभक्तीच्या ह्या उत्सवात ! असे गीताचे बोल आहेत.
कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या कशी करण्यात आली आणि त्याबद्दल तपासातून पुढे आलेलं सत्य काय आहे? जाणून घ्या सविस्तर…
बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. वकील ते राजकारणी कसा आहे राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास? जाणून घ्या…
बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष प्रकरणातील 16 आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश हे अवैध ठरवण्यात आले आहेत. राहुल नार्वेकरांच्या कोणत्या पाच निर्णयांविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो, याबद्दलच सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ…
जस राज्याचं राजकारण बदललं आहे तसेच कोल्हापूरचे राजकीय वातावरण सुध्दा बदललं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला सतेज पाटील, संजय मंडलिक, धनंजय महाडिक की यांच्यापैकी आणखी कोणी निवडून येणार? आणि कोल्हापूर लोकसभेचे यंदाच गणित नेमकं कसं असणार? याबद्दल जाणून घ्या