राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात बारामती लोकसभेबाबत त्यांनी रोखठोक उत्तरे दिलीत. बारामती लोकसभा निवडणूक कशी असणार आहे. पक्षाची पुढील रणनिती काय असणार आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरेही सुप्रिया सुळे यांनी दिलेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या आधीपासून कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही अशी चर्चा होती, त्यामुळे सातत्याने अशोक चव्हाण भाजपसोबत जाण्याची चर्चा का होतेय? ते भाजपात गेल्यास कॉंग्रेसला काय फटका बसेल? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची अवस्था ही कढीपत्त्यासारखी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटल आहे. सध्याची महायुतीतील छोट्या पक्षांची अवस्था आणि त्यांची खदखद नेमकी काय आहे? याबद्दलचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपनेही तयारीची लगबग सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाची रचना आणि येथील सध्याची स्थिती तसेच या मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे? याबद्दलचाच आढावा देणारा हा व्हिडिओ.
मुंडे भावा-बहिणींच्या नात्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष संपल्याचं चित्र आहे. धनंजय मुंडे यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे येणाऱ्या लोकसभेसाठी प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आणि त्याची जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावा-बहिणीच्या राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. याच ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भजनी ठेक्याचा बाज असणारे एक रोमांचक उत्सवगीत आता खास रे टीव्ही (Khaas Re TV) घेऊन आले आहे. माझा प्राण, प्रभुराम !! मुखी नाम, बोला जय श्रीराम !! चला सामील होऊया रामभक्तीच्या ह्या उत्सवात ! असे गीताचे बोल आहेत.