Ground Report : पुण्यात धंगेकरांची हवा की मोहोळांचं गणित? कोणाचा फुगा फुटणार?
पुणे : मागच्या दशकभरापर्यंत पुण्याच्या राजकारणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे वर्चस्व होते. खासदारकी, आमदारकी, महापालिका असे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. पण 2014 मध्ये मोदी लाट आली आणि पुण्याचा ताबा भाजपने घेतला. गत दोन्ही लोकसभेला तीन-तीन लाखांच्या लीडने इथे भाजपचा खासदार निवडून आला. आमदारकी, महापालिका असे सगळे भाजपने आपल्या पंखाखाली आणले. (In Pune, Congress has nominated MLA Ravindra Dhangekar and BJP has nominated Muralidhar Mohol.)
पण यंदाची लोकसभेची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरली. काँग्रेसने यंदा कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या रुपाने एक तगडा उमेदवार मैदानात उतरवला. डोळे झाकून भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी स्थिती असलेल्या मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी विजयाची गणिते कशी साधता येतील याचे आराखडे भाजपचे नेते मांडताना दिसत आहेत.