Video : वसुंधराराजेंचा व मोदींचा वाद काय ?

भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक जुने आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारलं जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सख्य नसलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia ) यांचाही नंबर लागण्याची परिस्थिती निर्माम झाली आहे. गेल्या दोन दशकात राजस्थानात भाजपचा (BJP) मुख्य चेहरा वसुंधराराजे या आहेत. परंतु त्यांचा विधानसभेच्या निवडणूक प्रचार समिती आणि जाहीरनामा समितीमधून पत्ता कट केला आहे. वसुंधरराराजे यांना भाजप का साइडलाइन करत आहे. त्यांच्या व मोदींचा वाद काय आहे ? हे जाणून घेऊया…

एकेकाळचे राजस्थानमधील भाजपचे चेहरे म्हणजे माजी उपराष्ट्रपती भैरोंसिंह शेखावत व माजी संरक्षणमंत्री जसवंत सिंह होय. जसवंत सिंह यांनी वसुंधराराजे यांना राजकारणात आणले. जसवंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली वसुंधराराजे यांनी राजकीय अस्तित्व निर्माण करत राजस्थानच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. शेखावत हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर वसुंधराराजे राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष होत भाजपच्या मुख्य चेहरा झाल्या. त्या 2003 ते 2008 व 2013 ते 2018 अशा टोन टर्म राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्यात.

अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube