Election Results 2023 : PM मोदींशिवाय पर्याय नाहीच! अजितदादांची पहिली प्रतिक्रिया..

Election Results 2023 : PM मोदींशिवाय पर्याय नाहीच! अजितदादांची पहिली प्रतिक्रिया..

Election Results 2023 : देशात चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून (Election Results 2023) आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदी फॅक्टर चालला आहे. लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतांचं दान केलं अन् सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाट करून दिली. या राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सत्ता होती. या दोन्ही राज्यांत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. तर मध्यप्रदेशातही काँग्रेसला खूप मागं ढकललं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींशिवाय (PM Modi) पर्याय नाहीच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे अजित पवार म्हणाले.

Election Results 2023 : 2018 मधील चूक टाळली, मोदी फॅक्टर चालला; 3 राज्यांत भाजप सुस्साट!

अजित पवार आज मंत्री अदिती तटकरे यांच्यी श्रीवर्धन मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चार राज्यांतील निवडणुकांच्या मतमोजणीवर प्रतिक्रिया दिली. तेलंगणातील केसीआर महाराष्ट्रात फिरले. देशाच्या सगळ्या टीव्ही चॅनेलवर जाहिराती दिल्या. आताच्या निकालावरून त्यांची परिस्थिती बिकट आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही भागात भाजपाचाच विजय होईल, अशी परिस्थिती आहे. आम्ही घेतलेली भूमिका काही जणांनी आवडली नाही. पण, कुणी काही म्हटलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असे अजित पवार म्हणाले.

तीन राज्यांत भाजप सुस्साट ! 

छत्तीसगडमध्ये एकूण 90 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडलं. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात एकूण 1 कोटी 55 लाख 61 हजार 460 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला होता. छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच 75.8 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे पुरुष मतदारांपैकी महिला मतदारांचा अधिक कल यंदाच्या मतदानात दिसून आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच निवडणूक निकालांचे एक्झिट पोल समोर आले होते. इंडिया टुडे आणि माय इंडिया संस्थांच्या पोलनूसार काँग्रेसला 40-50 जागा तर भाजपला 36-40 जागा मिळणार असल्याचं दिसून आलं होतं. एक्झिट पोलनूसार भाजप-काँग्रेसमध्ये चुरस असल्याचं सांगण्यात येत होतं. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरल्याचं आजच्या निकालावरुन दिसून येत आहे.

Election Results 2023 : भाजपनं जिंकल्याचा दावा करणं हाच मोठा विनोद; राऊतांचा मोदी-शहांना खोचक टोला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube