“अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरविल”, सुजय विखेंचं जशास तसं उत्तर
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील जनतेनं तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचं कारण काय? अहो ताई, लोकशाही प्रक्रीयेत मायबाप जनता बाप असते. तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल असे सडोतोड उत्तर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांना दिले.
साकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डॉ. सुजय विखे यांनी पुन्हा एकदा आ. बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. चाळीस वर्षे सर्व सतास्थाने असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी मिळवून देता आलं नाही. या भागात युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत. या निष्क्रीयतेवर बोललो तर तुम्ही थेट बाप काढला.
Sujay Vikhe : ईव्हीएम तपासणी अन् पडताळणीचे ‘ते’ वृत्त चुकीचे, जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण
आमच्या भागात येवून आमच्या वडीलांवर वाटेल तशी टिका केली. पण आम्ही संयम दाखवून राजकारण करणारी माणसं आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विखे पाटील परीवाराने नेहमीच आवाज उठवला. या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही आलो आहोत. साकूरची सभा प्रस्थापितांच्या विरोधातील परीवर्तनाची नांदी असल्याचा इशारा डॉ. विखे पाटील यांनी दिला.
वर्षवर्षानुवर्षे ज्या जनतेन निवडून दिलं त्यांचा बाप तालुक्याच्या राजकन्या काढायला निघाल्या. पण कुणाच्या बापाबद्दल नाही तर तालुक्याच्या आमदाराच्या निष्क्रीयेतवर बोलल्याचा टोला लगावून विखे पाटील म्हणाले, की लोकशाही प्रक्रीयेत जनता मायबाप असते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता ठरवेल तालुक्याचा बाप कोण आहे. पण ताईंना बोलायला भाग पाडत आहेत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
बापाविषयी बोलाल तर! तुम्ही वडिलांकडून धडे घ्या; विखेंचा थोरातांना खोचक सल्ला
तालुक्यातील युवकांनी मनगटातील ताकद दाखवून या प्रस्थापितांना धडा शिकवावा असे आवाहन करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही जेवढा आवाज दाबाल तेवढा तुमच्या घरापर्यंत येईल असे डॉ. विखे यांनी ठणकावून सांगितले. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याने तालुक्याचा आमदार सुद्धा महायुतीचाच करायचा आहे. उमेदवार कुणीही असो सुजय विखे तुमच्या प्रश्नासाठी बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारे यंदा आमदारही होणार नाहीत.. सुजय विखेंचा थोरातांना खोचक टोला