‘विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल’; राहुल कलाटेंसाठी सुप्रिया सुळे मैदानात…

‘विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल’; राहुल कलाटेंसाठी सुप्रिया सुळे मैदानात…

Rahul Kalate News : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. सुळे यांनी आज चिंचवड मतदारसंघात येत महिला मतदारांसोबत संवाद साधलायं. यावेळी बोलताना सुळे यांनी विकासाची चाहूल, निवडा राहूल, असं आवाहन मतदारांना केलंय.

विजय तर वळसे पाटलांचाच; भेटीदरम्यान आढळरावांनी जयंत पाटलांना सांगून टाकलं

सुप्रिया सुळे यांनी चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यालयाला भेट देऊन सोसायटी धारकांसोबत संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, चिंचवड मतदारसंघात शहरीकरण वाढते आहे. पण, त्याप्रमाणे महिला आरोग्य आणि सुरक्षितता यांच्यासाठी कोणतेही ठोस काम सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही.

तसेच चिंचवड मतदारसंघात महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा महिला मतदार चिंचवडचा आमदार ठरविण्यात निर्नायकी भूमिका बजावतील आणि महिला मतदार विकासाची भूमिका मांडणाऱ्या राहुल कलाटे यांना साथ देतील, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्या.

जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी सोसायटीधारकांनी आपल्या पाणी, वीज, रस्ते अशा समस्या सुळे यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या सर्व प्रश्नांना सुळे यांनी ऐकून घेतले आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सुळे यांनी देत आता विकासाची चाहूल निवडा फक्त राहुल असे आवाहन नागरिकांना केले आहे..

दरम्यान, चिंचवडमध्ये गेली १२ वर्षे आम्ही रहात आहोत. शहर वाढले पण त्याप्रमाणात सुविधा आलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी आमचे आरोग्य, सुरक्षितता, स्वावलंबन याला महत्व देणाऱ्या राहुल दादांना साथ देऊन परिवर्तन घडवणार असा निर्धार महिलांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात केलेला असल्याचं राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय.

मी दहशत, दादागिरी करतो असं जनता म्हणत नाही, हे काम फक्त नेतेमंडळी करतात; शिवाजीराव कर्डिले

मतदारसंघात मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. महागाईचा प्रश्न खूप गंभीर आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या वर्गातील महिलांशी संवाद साधतांना या प्रश्नाची प्रकर्षाने जाणीव होते. महिलांच्या आरोग्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यातूनच कॅन्सर जनजागृती अभियानासारखे उपक्रम आम्ही राबवले असल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केलंय.

महाविकास आघाडी आणि पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा उद्या (ता. १२) संध्याकाळी 5 वाजता, विमल गार्डन, रहाटणी येथे होणार आहे. सर्वांनी बहुसंख्येने सभेला उपस्थित रहावे अशी विनंती पक्ष आणि उमेदवार कलाटे यांच्याकडून करण्यात आलंय. एरवी सर्वांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारे जयंत पाटील पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा चिंचवडमध्ये येणार आहेत त्यामुळे त्यांचा सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube