एकनाथ शिंदे अजूनही नाराज.., मंत्रिमंडळात सहभागी होणार का?, फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis On Eknath Shinde : उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून शपथ घेणार आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
आज महायुतीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. असं वक्तव्य केल्याने एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार का? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहवं अशी विनंती केली आहे . तसेच त्यांच्या आमदारांची देखील हीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आताच आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिलेलं आहे. नियमानुसार, राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आम्ही दावा केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला 5 तारखेला संध्यकाळी साडेपाच वाजचा शपथविधीची वेळ लिहून दिली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे आणि या सगळ्यांच्या सहीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अमित शहांचे आदेश, शिंदेंना धक्का, ‘या’ 3 मंत्र्यांना मिळणार डच्चू?
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का देत महायुतीने 236 जागांवर विजय मिळावला आहे. तर महाविकास आघाडी फक्त 46 जागांवर यश आले आहे.