महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा! एकनाथ शिंदेंनी सुपूर्द केलं राज्यपालांना पत्र

महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा! एकनाथ शिंदेंनी सुपूर्द केलं राज्यपालांना पत्र

Maharashtra Govt Formation Governor Letter Given By Eknath Shinde : राज्यात उद्या महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra Govt) पार पडणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असतील, हे आज अधिकृतरित्या जाहीर झालंय. राज्यात भाजप कोर कमिटीची आज सकाळी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

विधिमंडळ नेता घोषित केल्यानंतर महायुतीकडून (Mahayuti) महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय. महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.  राजभवनात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र सुपू्र्द करण्यात आलंय.

जो काँग्रेस के साथ जायेगा उसका..,; मुनगंटीवारांनी ‘बाळासाहेबां’च्या वाक्याची आठवण करुन दिली

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी उद्या (5 डिसेंबर) संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानाच होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय. यांच्यासोबत इतर काही मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

मी पुन्हा आलोय! महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्र’ पर्व; फडणवीसांची गटनेतेपदी निवड, उद्या ग्रँड शपथविधी

एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी शिफारस, पाठिंबा पत्र आम्ही राज्यपालांना देवून टाकले आहे. आतापर्यंत राज्याच्या इतिहासात एवढं बहुमत कोणालाही मिळाले नव्हते. आमच्यात छोटे मोठे कोणी नव्हते, टीम वर्क म्हणून काम केले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 पेक्षा जास्त दिवस उलटले होते. परंतु मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर मोहर लागलेली नव्हती. अखेर आज सगळ्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्या अनुषंगाने आता महायुतीच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आलाय. उद्याच्या शपथविधिसाठी लाडक्या बहि‍णींना आमंत्रित करण्यात आलंय. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube