आयोगाकडून मोठी कारवाई, तब्बल 546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Maharashtra Assembly Election 2024 : सध्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार घराघरात जाऊन प्रचार करत आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एका महिन्यात तब्बल 546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
तर दुसरीकडे आचारसंहिता भंगाच्या 7360 तक्रारी निकाली लावल्या असल्याची माहिती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे. विधानसभा निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण 7 हजार 400 तक्रारी आयोगाला प्राप्त झाले होते. त्यापैकी आयोगाने 7 हजार 360 तक्रारी निकाली काढल्या असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
तर सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. अशी माहिती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे.
चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार : खासदार संजय राऊत
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. राज्यात यावेळी मुख्य लढत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) होताना दिसत आहे. त्यामुळे महायुती पुन्हा सत्तेत येणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
मतदारसंघाचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीने मतदान करा, संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आवाहन