आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट
मंचर : आंबेगावा तालुक्यात सहकारमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांचं पारडं जड असल्याचे चित्र काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वळसे पाटलांचा विजय निश्चित मानला जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यभरात चाणक्य, द बातमी, गृह विभाग आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेमध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलणार, गणितं जुळवायला खूप वाव ; दिलीप वळसे पाटील
राज्यातील बहुचर्चित आणि लक्षवेधी असणाऱ्या मतदार संघांपैकी एक असणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदार संघातदेखील मोठी चुरस निर्माण झाली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होत असून बहुतांश विधानसभा मतदारसंघांची गणितं बदलून गेली आहेत.
वळसे पाटलांचं शिरुरवर लक्ष; गावभेटी अन् सभांचा धडाका, नागरिकांशी संवाद..
सर्व्हे अथवा ओपिनियन पोल हे अगदी अचूक ठरतातच असे अजिबात नाही; मात्र आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मागील ३५ वर्ष सातत्याने निवडून येणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांना शरद पवारांची साथ सोडल्यामुळे काही काळ जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं; मात्र प्रचारादरम्यान दिलीपराव वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर आणि जवळपासच्या परिसरातील बागायती क्षेत्र वाचविण्यासाठी आणि आपल्या हक्काचे पाणी राखण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असून आपली लढाई शरद पवारांच्या विरोधात नाही अशी भूमिका सातत्याने मांडून जनमत टिकवून ठेवल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे.
बच्चू कडूंच्या ‘प्रहार’चा वळसे पाटलांना पाठिंबा; विकसनशील नेतृत्व म्हणत आंबेगावात ताकद वाढवली
वळसे पाटलांचा मतदार व्यक्त होत नाही, थेट कार्यक्रम करतो
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वर्षांपासून वर्चस्व असून, वळसे पाटील यांच्या शांत संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचा या मतदारांवर मोठा प्रभाव असून, प्रत्यक्ष मतदान पार पडल्यानंतर वळसे पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतात हा आजवरचा इतिहास आहे.
जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही
डिंभ्याचे पाणी कर्जतला नेण्यावर रोहित पवार ठाम डिंभे आणि माणिकडोह धरणादरम्यान बोगदा पाडून कुकडी प्रकल्पातील पाणी कर्जत जामखेडला घेऊन जाण्यावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार ठाम असून; शरद पवारांच्या पक्षात राहिल्यास आंबेगावच्या आमदाराला यासाठी संमती देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही याची खात्री असल्याने सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांचा आदर ठेवून पक्षांतर केल्याचे प्रामाणिकपणे कबूल केले आहे. हीच बाब आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या आता लक्षात येऊ लागल्याने मतदारांनी देवदत्त निकम यांच्याकडे पाठ फिरविले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.