Assembly Election: जागा वाटपात पटोले काकणभर सरस ठरले ! काँग्रेस शंभरीपार, ठाकरे पवारांवर भारी
प्रशांत गोडसे: प्रतिनिधी, मुंबई
Mahavikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देखील सुटला नव्हता. जागा वाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून दावे प्रतिदावे केले जात होते. विधानसभेच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलात समसमान जागा दिले जाणार असल्याचे बोलले जात होते. कमी जागा मिळत असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यावर नाराजी व्यक्त केली होती. तरीही काँग्रेसला काही प्रमाणात फायदा झाला आहे. काँग्रेसने (Congress) शंभरीहून अधिक जागा पदरात पाडून घेत ते महाविकास आघाडीत मोठे भाऊ ठरले आहेत.
Assembly Election: भाजपचं मोठा भाऊ; 148 जागा मिळविल्या; मुख्यमंत्री शिंदे जड गेले पण
काँग्रेस पक्षाने 102 उमेदवार देऊन महाविकास आघाडीत आपणच मोठे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तूर्तास तरी काँग्रेस पक्ष मोठा ठरला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु होते. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षात काही जागांचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही. त्यासाठी दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे देखील बैठका पार पडल्या होत्या. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांकडून 291 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणते उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात हे पहावे लागणार आहे. काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार दिले आहे. ठाकरे शिवसेनेला 97 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेला दहापैकी आठ जागा जिंकून 80 टक्के स्ट्राइक रेट राखणाऱ्या शरद पवार यांना जागा वाटपात काहीशी पडती बाजू घ्यावी लागली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 87 जागा मिळाल्या आहेत. तर छोट्या पक्षांना केवळ पाच जागा मिळाल्या आहे.
‘या’ जागांवर मैत्रीपूर्ण लढती की वाद ?
मिरज विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेचे तानाजी सातपुते तर काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहन वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
सांगोला विधानसभा मतदारसंघातून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दीपकआबा साळुंखे तर शेकापाकडून बाळासाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून दिलीप माने तर ठाकरे शिवसेनेकडून अमर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून
काँग्रेसकडून भागीरथ भालके तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परांडा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून रणजीत पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे, दिग्रस विधानसभा मतदारसंघातून
ठाकरे यांच्याकडून शिवसेनेकडून पवन जैस्वाल तर काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे यांना तिकीट देण्यात आले आहे.