‘समृद्धी’ने आर्थिक विकासाचे दरवाजे उघडले ! नागपूर ते मुंबई आता ‘सुपरफास्ट’
हा केवळ महामार्ग नसून, तो सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बनविणारा मार्ग आहेत. त्याचा आर्थिक विकासापासून दूर असलेल्या वंचित विदर्भाला होणार आहे,
Samruddhi Expressway: राज्यातील सर्वाधिक लांबीचा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) हा विकासाचा महामेरू ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांसाठी हा महामार्ग आर्थिक विकासाचे दरवाजे उघडणार आहे. मुंबई (Mumbai) ते नागपूर (Nagpur) जोडणारा हा 701 किलोमीटरचा महामार्ग आहे. हा महामार्गाचे श्रेय हे महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जाते. कारण नागपूरचे महापौर असताना या महामार्गाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. स्वराज्यच्या एका रिपोर्टनुसार हा महामार्ग अंतिम टप्प्यात आहे.
PM Modi : पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो
फडणवीस यांनी सुरुवातीला नागपूरच्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी लक्ष्य केंद्रीत केले होते. राज्याची उपराजधानी नागपूरचा विकास हा आर्थिक केंद्र मुंबईला जोडल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे नागपूरचा आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग हा विकासाचे नवीन इंजिन असेल. त्यामुळे ग्रामीण भाग हा शहरांना जोडला जाईल. त्यामुळे विदर्भाच्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग होईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. हा केवळ महामार्ग नसून, तो सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बनविणारा मार्ग आहेत. त्याचा आर्थिक विकासापासून दूर असलेल्या वंचित विदर्भाला होणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कसा आहे समृद्धी महामार्ग
हा महामार्ग 701 किलोमीटरचा आहे. समृद्धीमुळे नागपूर आणि मुंबईचा प्रवास अवघ्या सात तासात होतो. या भव्य प्रकल्पामध्ये एकूण सहा बोगदे आहेत. ज्यात कसारा घाट आणि इगतपुरी दरम्यानच्या 7.7 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यांचा समावेश आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग बोगदा देखील आहे. तीन वन्यजीव अभयारण्ये, 35 वन्यजीव केंद्र क्षेत्रे, तसेच वर्धा नदीवरील 310 मीटर लांबीचा उंच पूल आहे. हा रस्ता राज्यातील दहा प्रमुख जिल्हे येतात आणि अप्रत्यक्षपणे राज्यातील आणखी 14 जिल्ह्यांना जोडतो. या रस्त्यावर 24 इंटरचेंज आहेत, जो अनेक औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांना जोडतो.
वन्यजीव प्राण्यांचा विचार
हा मार्गावर अनेक ठिकणी जंगले आहेत. त्या जंगलातील प्राण्यांचाही सरकारने विचार केला आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी, रस्त्यावरील प्राण्यांचे मृत्यू टाळण्यासाठी प्राण्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी अंडरक्रॉसिंग, ओव्हरपास, हाय बॉक्स कल्व्हर्ट यासारख्या विशेष उपाययोजना विकसित करण्यात आल्यात.
सुवर्ण त्रिकोणामुळे राज्याची भरभराट
महाराष्ट्राचा आर्थिक विकास प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि नाशिक अशा “सुवर्ण त्रिकोण”तून होतो. या तीन जिल्ह्यांचा राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या 60 टक्के वाटा आहे. देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट, मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) तसेच नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन विमानतळासह आर्थिक केंद्रांना जोडण्यासाठी या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
