अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून याआधी असा महाराष्ट्र कधी नव्हता. कुठला आमदार कुठल्या पक्षात काहीच कळत नाही. पूर्वी आमने-सामने या गोष्टी होत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असल्याचं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंनी एका मुलाखतीत आपलं मत स्पष्ट केलंय. राज […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यप्रणालीबद्दल हरकत घेतल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी सरकारकडून राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणाने झाली. यावेळी रमेश बैस यांनी 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा […]
मुंबई : गद्दार गद्दारी करण्यासाठी कारणं देत असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं महाविकास आघाडीचं षडयंत्र होतं, असा आरोप […]
मुंबई : हिवाळी अधिवेशनात आपल्या बाळाला घेऊन आल्याने नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या होत्या. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार सरोज अहिरे यांची चर्चा सुरु आहे. हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्याचा आरोप करत सरोज यांनी सुविधायुक्त कक्षाची मागणी केलीय. सुविधायुक्त कक्ष न मिळाल्याचं अधिवेशन सोडून जाणार असल्याचं आमदार सरोज अहिर यांनी ठणकावून सांगितलं आहे. Italy […]
मुंबई : नवनिर्वचित राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसदर्भात राज्यात सध्या अनेक प्रश्न उपस्थित असताना राज्यपाल रमेश बैस आपल्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देणार असल्याचं वाटलं, पण हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा घणागात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अधिवेशनाच्या अद्याप सुरुवातही झाली नाही, त्याआधीच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यासाठी […]
कोल्हापुरातील कणेरी मठातल्या 52 गाईंचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला तर आणखी पन्नासेक गाई गंभीर आहेत. कणेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू असून लोकोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री येऊन गेले. त्यानंतर गाईंचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं उघड झालंय. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून गाईंना श्रद्धांजली वाहत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधून टीका करण्यात आलीय. अग्रलेखात म्हटलं, “कणेरी […]
जळगाव : राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, ते सोडून टीका-टिप्पण्णी करत असल्याचा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही. […]
नवी दिल्ली : मनिष सिसोदिया निर्दोष असून त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण असल्याचं विधान राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. काल रात्री दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीसह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनीष बेक़सूर हैं। उनकी गिरफ़्तारी गंदी […]
मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? हा सवाल आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारलं आहे. काल वरळीत झालेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांवर जोरदार निशाणा साधत सडकून टीका केलीय. ते म्हणाले, हे गद्दार सरकार फक्त महाराष्ट्रासाठी […]
मुंबई : गद्दारांनी लक्षात ठेवावं हा थोड्या दिवसांचा खेळ आहे, तुम्हाला जागा दाखवून देणार असल्याची तोफ उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर डागली आहे. आदित्य ठाकरेंनी आज वरळीतील जाहीर सभेतून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच एकूण 40 आमदारांना चांगलच धारेवर धरलं आहे. ठाकरे […]