अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
छत्रपती संभाजीनगर : नाव बदलल्याने शहराचा इतिहास बदलत नाही, आता मुंबईचं नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. खासदार जलील यांनी काल त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत जलील यांनी ही मागणी केलीय. आमचा नावाला विरोध नाही पण नाव बदलल्याने नागरिकांना अर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार […]
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय, अशा धमकीचा फोन एका अज्ञाताकडून नागपूर पोलिस कंट्रोलला आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. काल नागपूर पोलिसांना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर पोलिस यंत्रणेची झोप उडाली असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. अज्ञात […]
नागपूर : मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न, ते कधीच पूर्ण होणार नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे. खासदार सावंत आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारला कडक शब्दांत ठणकावलं आहे. खासदार म्हणाले, निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपच्या संहितेनुसार निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि […]
नागपूर : पक्षाचा द्रोह करण्यासाठी दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा पक्षद्रोहच असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केलीय. खासदार अरविंद सावंत नागपूरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. Post on Chandrakant Patil : ‘दडपशाहीचे साधन म्हणून कायद्याचा वापर करू नका ! हायकोर्टाचा पुणे पोलिसांना दणका खासदार सांवत […]
लातूर : मराठवाड्यात दोन जिल्ह्यांच्या नामातंरानंतर आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यासाठी आमदार संजय बनसोडे आक्रमक झाले आहेत. उदगीर तालुक्याला जिल्हा घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी केलीय. स्वंतत्र उदगीर जिल्ह्याचा प्रश्न विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले […]
कर्नाटक : कर्नाटक सरकारच्या बदलीच्या आदेशानंतरही दोन्ही सनदी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याचं समोर आलंय. आयपीएस अधिकरी डी रुपा यांनी आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्याविरोधात तीन वृत्तपत्रांमधून माहिती शेअर केली आहे. कर्नाटक सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरुन बदली केली आहे. त्यानंतर आयपीएस डी उपा यांनी शेअरमध्ये डीसी म्हैसुरु रोहिणी सिंधुरी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांचे आकडे […]
मुंबई : अभिमत विद्यापीठांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती (शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती) लागू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता प्रत्यक्षात शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्यातील पारंपरिक विद्यापीठ संलग्नित कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू आहे. […]
पालघर : पालघरमधील जव्हार पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेतच आमदार सुनिल भुसारा अधिकाऱ्यांवर भडकल्याने गोंधळ झाला आहे. जव्हार पंचायत समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. आमदार भुसारा यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आमसभेत कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनिल भुसारा चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. आमदार भुसारा यांचा अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाचा व्हिडिओ सध्या […]
औरंगबाद : राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध चांगलचं रंगलंय. काल अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंदक्रांत खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अमित शहा सॅटेलाइट नियंत्रित करून ईव्हीएम मशीन हॅक करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलीय. ईव्हीएम हॅक […]