साताऱ्यात शिंदे गटाची ताकद वाढणार! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिंदे गटाच्या गळाला…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडली आहे. नाशिकच्या नगरसेवकांनंतर आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या प्रवेशामुळे सध्या राज्यात एकच चर्चा रंगलीय.
#नाशिक जिल्ह्यातील #सुरगाणा नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांसह #नवी_मुंबईतील माथाडी कामगार नेते ऋषीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #Shivsena… pic.twitter.com/uRoAwTSdGm
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 4, 2023
साताऱ्यातील जावळी तालुक्यात शिंदे बंधूंचा दबदबा आहे. शशिकांत शिंदे यांच्या बंधूंचाही राजकारणात चांगलाच दबदबा आहे. भाजपचे आमदार असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळीत अस्तित्व निर्माण केलंय. काही दिवसांपूर्वीच जावळीचे नेते अमित कदमांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद निर्माण झालीय.
रेल्वे अॅक्सिडेंटनंतर फक्त 35 पैशात मिळतो विमा; जाणून घ्या सविस्तर माहिती
मात्र, नूकताच ऋषिकांत शिंदे शिंदे गटाच्या गळाला लागल्याने एकनाथ शिंदे यांचं बळ वाढणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचंही मानलं जातंय. आमदार शिवेंद्रराजेंना शिंदेंच्या प्रवेशामुळे पाठबळ मिळणार असल्याचं भाकीत अनेकांनी केलंय.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आपले भाजप आणि शिंदे गट राजकीय विरोधक असल्याचं विधान आमदार शिंदे यांनी केलं होतं. पण त्यांचेच बंधू ऋषिकांत शिंदे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांनाही धक्का बसला असून आता पुढील काळात आमदार शिंदे कोणतं पाऊल उचलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.