पक्षांतरबंदी किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर एखादा सदस्य अपात्र ठरल्यास किती काळासाठी तो अपात्र ठरू शकतो याबाबत नेहमीच संभ्रम आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काही राजकीय जाणकारांनी सुद्धा आपल मत व्यक्त केल आहे. यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ…
विश्वचषक 2023 मध्ये दमदार एंट्री केल्यानंतर टीम इंडियातून मात्र ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची टीम इंडियामध्ये वर्णी लागली. टीम इंडियात हार्दिक पांड्याच्या जागी मोठ्या स्पर्धांचा अनुभव नसलेल्या प्रसिद्ध कृष्णालाच का संधी देण्यात आली असा प्रश्न आता विचारला जात आहे. याबद्दलचा आढावा.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते सचिन पायलट यांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात सचिन पायलट यांनी घटस्फोटीत असा उल्लेख केला आहे. या उमेदवारी अर्जातील उल्लेखामुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा सचिन आणि सारा पायलट यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
मराठा आरक्षणाबद्दल राज्य शासनाने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. परंतु क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे नक्की काय? कोणत्या कारणासाठी दाखल केल्या जातात? आणि त्यांची सुनावणी कोणापुढे केली जाते ? या सगळा प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घ्या.
हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला (Sharad Pournima) विशेष महत्त्व प्राप्त आहे. शरद पौर्णिमेचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हंटले जाते. याच शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. हा दिवस इतका शुभ आणि सकारात्मक आहे की लहान सहान उपाय केल्याने सुध्दा अनेक […]
माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात मागे घेतला आहे. निलेश राणे यांच्या निवृत्ती नाट्याची स्टोरी ही वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच आशीर्वादाने लिहिली असल्याचे बोलले जात आहे. परंतु यामागे नक्की काय राजकीय खेळी आहे? याबद्दलचं लेट्स अप मराठीने घेतलेला आढावा.
ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजरपणामुळे ते अंथरुनालाच खिळून होते. 26 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता नेरुळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांच वारकरी संप्रदायात अमुल्य योगदान आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळण्यात आलेला 22वा सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सामना ठरला आहे, कारण या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यातील काही विशेष बाबींवर आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीबद्दल माहिती देणारा हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटुन उठला आहे.मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो, तेव्हा कुणबी-मराठा हा मुद्दाही चर्चेत येतो.या पार्श्वभूमीर खरंच कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत की वेगळे आहेत? ही माहिती समजून घेणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे. मुदती नतंर पाटील यांनी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मात्र आमरण उपोषणासोबत त्यांच्याकडे अन्य काही पर्याय आहेत का? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. याच प्रश्नाचा लेट्सअप मराठीने घेतलेला आढावा.