बारामती : नुसता व्यक्ती निवडून देऊन, काम न करता संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. आता मी जर इथे न येता मी मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
मुंबई : भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा आणि भुवया उंंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे चर्चेचा विषय ठरला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते तब्बल 483 कोटींचे मालक आहेत. इतरही उमेदवारांची संपत्तीही कोट्यावधीच्या घरात आहे. […]
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. या तिघांनीही काल (15 फेब्रुवारी) अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे भाजपकडून हे तिघेही खासदार म्हणून […]
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सविस्तर चर्चा केली जाईल, याशिवाय राज्य […]
शिर्डी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (BhauSaheb Wakchoure) यांच्या घरवापसीनंतर घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काल (14 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असतानाच इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, आम आदमी पक्ष यांच्यापाठोपाठ जागावाटपाच्या चर्चांचे गुऱ्हाळ संपत नसल्याने नॅशनल कॉन्फरन्सनेही इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे धक्कातंत्र हा आता जुना पण नेहमीचा चर्चेतील विषय राहिला आहे. आताही नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील 56 जागांवरील राज्यसभेच्या निवडणुकीत या धक्कातंत्राचा प्रत्यय आला. या निवडणुकीपूर्वी भाजपचे 28 खासदार निवृत्त झाले होते. आता तेवढेच खासदार पुन्हा निवडून येणार आहेत. मात्र या 28 पैकी भाजपकडून तब्बल सात केंद्रीय मंत्र्यांसह 24 जुन्या आणि […]
साल 2008. “नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी.” साल 2015. “माझ्या पराभवाला माझ्याच पक्षातील काही लोक जबाबदार आहेत. त्यांना मी पहिल्या दिवसापासून आवडत नाही.” साल 2017. “फक्त नारायण राणेला अडचण निर्माण करायीच एवढेच काम अशोक चव्हाण यांना आहे.” साल 2024. “अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी. नारायण राणेंचा पत्ता कट!” वर्ष बदलली, पक्ष […]
“कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजणार! पुण्याचे मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasanat More) यांचे अलिकडील काही दिवसांतील हे व्हॉट्सअॅप स्टेटस. या स्टेटसवरुन प्रचंड धुरळा उडाला. मोरे यांनी ते स्टेटस नेमके का ठेवले होते? कोणाला उद्देशून ठेवले होते? […]
लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणि आणखी काही काँग्रेस (Congress) आमदार भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या चर्चेला […]