शिर्डीत शिवसेनेला मिळाला नवा शिलेदार : ठाकरेंची साथ सोडलेले घोलप शिंदेंकडे; लोखंडेंचा पत्ता कट?

शिर्डीत शिवसेनेला मिळाला नवा शिलेदार : ठाकरेंची साथ सोडलेले घोलप शिंदेंकडे; लोखंडेंचा पत्ता कट?

शिर्डी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (BhauSaheb Wakchoure) यांच्या घरवापसीनंतर घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काल (14 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. शिंदे यांनी चर्मकार समाजाच्या 90 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत, असे म्हणत त्यांचे कौतुकही केले होते. त्यानंतरच ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून मुलीला उमेदवारी मिळावी, अशी घोलप यांची होती. त्यासाठी ते प्रयत्नही करत होते. मात्र, ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे तिकीटही अंतिम समजले जात आहे. त्यामुळे घोलप नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच त्यांना शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदावरुनही हटविण्यात आले. आता त्यांनी थेट ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. (Former minister Babanrao Gholap, who left Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) faction, will join Shiv Sena.)

‘मूळ राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवारच’; विधानसभा अध्यक्षांचा शरद पवार गटाला दणका

बबनराव घोलप हे नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून 1980 ते 2009 असे सलग पाचवेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी 1995 साली युती सरकारमध्ये मंत्रिपद देखील भूषवले आहे. तब्बल तीस वर्षे नाशिक जिल्ह्यात त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवत शिवसेनेला बळकटी दिली होती. 2014 मध्ये त्यांचा मुलगा योगेश घोलपही आमदार म्हणून निवडून आले. पण 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.

यादरम्यान घोलप यांनी शिर्डीमध्ये काम सुरु केले. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांची उमेदवारीही जाहीर केली होती. परंतु एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे ऐनवेळी भाजपमधून आयात करुन सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी घोलप यांचा मुलगा योगेश घोलपही इच्छुक होते. आता पुन्हा 2024 साठी घोलप हे शिर्डीतून इच्छुक होते. त्यांनी तयारी सुरू केली होती.

INDIA आघाडीपासून आणखी एक पक्ष दुरावला : फारुख अब्दुल्लांची स्वबळावर लढण्याची घोषणा

मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर देखील त्यांनी शिंदेंना डावलत ठाकरेंच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तसेच त्यांनी उमेदवारीचा शब्दही देण्यात आला आहे. त्यामुळे घोलप ही नाराज झाले. त्यानंतर आता त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आता लोखंडे यांचा पत्ता कट होणार असल्याच्या आणि घोलप यांना किंवा त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube