संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पासोबत आणखी एका मुद्द्याची चर्चा होते आहे, ते म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani). अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Reserch) प्रकाशित केलेल्या रिपोर्टमुळे जगभरात याची चर्चा झाली. राष्ट्रपती अभिभाषणावर झालेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) अदानी प्रकरणावरून सरकारवर तर जोरदार टीका केलीच पण […]
राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार […]
IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर २०० धावांची आघाडी घेतली आहे. नागपूरच्या जामठा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या 5 दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. मार्नस लबुशेनने 49 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. भारताकडून जडेजाने […]
हिंगोली: “९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हिंगोली (Hingoli) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?” असा प्रश्नही अजित […]
“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड […]
“इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या बॅटरीमध्ये (Electric vehicle battery) वापरासाठी गरजेचा असलेल्या ५९ लाख टन लिथियमचा (Lithium) साठा जम्मू-काश्मीरमध्ये सापडला आहे.” केंद्र सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. भविष्यात हा सर्वात उपयुक्त खजिना ठरेल. त्याची खासियत म्हणजे हा एक नॉन-फेरस धातू आहे, जो इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या बॅटरीमध्ये वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने (Ministry of Mines) गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार “भारतीय […]
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सुप्रीम कोर्टात (supreme court) प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सव्वा महिन्यानी लांबणीवर पडले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी14 मार्च रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे […]
पुणे (Pune) : पिंपरी चिंचवड (Chinchwad Election) पोटनिवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाकडून (election commission) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका कारमधून ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाची मोठी कारवाई केली आहे. चिंचवडमध्ये एका चारचाकी वाहनातून चाळीस लाख रुपयांची रोकड पकडली आहे. एवढी मोठी रक्कम कुणाची व कुठे जात होती याची तपासणी […]
सोलापूर लोकसभेची (Solapur Loksabha) जागा काँग्रेसने (Congress) लढवायची की राष्ट्रवादीने (NCP) याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. जयंत पाटील सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पाटील यांनी पक्षाच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी […]