Aaditya Thackeray यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू, तानाजी सावंत टीका
“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली.
सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचाराताच तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी तानाजी सावंत म्हणाले की, “सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कुठे जागा शिल्लक असेल तर त्याठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल.”
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ला मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे.”
कसबा व चिंचवडमधील दोन्ही उमेदवार विजयी होतील
यावेळी पत्रकारांनी पोटनिवडणुकीवर प्रश्न विचारताच ते म्हणायला की. “कसबा व चिंचवडमधील दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील.”
नक्की काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो आणि जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच.” असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होत.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघ वरळी येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांनाही आव्हान दिले होत. 40 आमदारांनी गद्दारी केली. तुम्हाला आव्हान आहे आमदारकीचा राजीमाना द्या. गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो. अस आदित्य ठाकरे म्हणाले होते.