Parliament Monsoon Session: मणिपूर हिंसाचार आणि ‘इंडिया’च्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील वाद टोकाला गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पत्र लिहून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी (26 जुलै) लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार […]
Delhi airport : दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाला इंजिन देखभालीदरम्यान आग लागली होती. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. विमान आणि देखभाल कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आणि मोठा अपघात टळला आहे. विमान वाहतूक नियामक डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. […]
Harmanpreet Kaur Ban: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसीने मोठा झटका दिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बेशिस्तपणा आणि अंपायरिंगच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आयसीसीने हरमनप्रीतवर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने रागाने तिची बॅट स्टंपवर आदळली होती. तसेच, सामना संपल्यानंतर अंपायरिंगच्या भूमिकेवरही तिने […]
Award Wapsi: पुरस्कार वापसीचा मुद्दा कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतो. अलीकडेच काही खेळाडूंनी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार लवकर शांत झाला नाही, तर पुरस्कार परत केला जाईल असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, बृजभूषण प्रकरणात देखील सरकारचा निषेध म्हणून पदक गंगेत फेकण्यासाठी पैलवान हरिद्वारला गेले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संसदीय समितीने विशेष पुढाकार […]
Supreme Court VS Central Govt : नागालँडमधील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. केंद्रावर निशाणा साधत न्यायालयाने म्हटले की, केंद्र सरकार भाजपशासित राज्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. नागालँडमध्ये महिलांना आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्यात महिला आरक्षण का लागू […]
Israel Judicial Reform: नेतन्याहू सरकारच्या विरोधात एक चतुर्थांश इस्रायल नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने इस्रायलमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. नेतन्याहू सरकारच्या न्यायिक सुधारणा विधेयकाला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. इस्रायलच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन मानले जात आहे. नेतन्याहू सरकारने मंजूर केलेले विधेयक इस्रायलची जनता अजूनही स्वीकारत नाही. […]
Sanjay Shirsat vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काल विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले होते. यावरुन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिरसाटांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार चांगलेच भडकल्याचे दिसून आले होते. पण आज सकाळी विधानभवन परिसरात वेगळचं चित्र […]
Meghalaya CM : मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला. यामध्ये पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. सीएम संगमा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. यामध्ये गारो हिल्स संघटनेचे लोक तुरा येथे हिवाळी राजधानीची मागणी करत आहे. यासाठी त्यांचे उपोषण सुरु आहे. मुख्यमंत्री कॉनराड […]
Monsoon Session 2023 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी 2000 च्या नोटाबंदीवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात 2000 हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण ही मुदत आणखी वाढवणार का, याबाबत लोकांच्या मनात […]
Karnataka High Court : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबई गँगने पाठवलेल्या मेसेजमध्ये 50 लाख रुपये तात्काळ पाकिस्तानच्या बँकेत जमा करणे हाच त्यांचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी के मुरलीधर यांच्या तक्रारीवरून बेंगळुरूच्या सायबर […]