काल आव्हान अन् आज मनोमिलन; रोहित पवार-संजय शिरसाटांनी हसत-हसत सोडवला वाद

काल आव्हान अन् आज मनोमिलन; रोहित पवार-संजय शिरसाटांनी हसत-हसत सोडवला वाद

Sanjay Shirsat vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काल विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले होते. यावरुन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिरसाटांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार चांगलेच भडकल्याचे दिसून आले होते. पण आज सकाळी विधानभवन परिसरात वेगळचं चित्र पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांशी हस्तांदोलन करत गप्पा मारताना दिसले. त्यामुळे रोहित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात मनोमिलन झाले की काय? अशी चर्चा विधानभवन परिसरात सुरु आहे.

दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न सरकार मार्गी लावत नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. ‘हे कसलं आंदोलन आहे. अडीच वर्ष सरकार होतं तेव्हा कुठे होतं हे एमआयडीसीचे आंदोलन. त्यावेळेला रोहित पवारांना बोलता आलं नाही. एमआयडीसी काय आज निर्माण करायची आहे का? अडीच वर्ष काय करत होते? विधानसभा सुरु असताना काही आमदारांना नाटकं करायची सवय आहे. त्यातूनच हे नाटकं सुरु आहे’, असा हल्लाबोल शिरसाटांनी केला होता.

‘खेकडा गुणकारी प्राणी, त्याला सांभाळलं असतं तर’.. गुलाबरावांचा ठाकरेंना खोचक टोला

यानंतर रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘शिरसाट साहेबांना मी विनंती करतो. उगाच पाठीवर काहीतरी बोलण्यापेक्षा हिम्मत असेल तर माझ्या समोर या. तुम्हाला एखाद्या विषयातील माहिती नसेल तर बोलू नका. महाराष्ट्रातले प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेले तेव्हा तुम्ही कुठे होतात? माझा मतदार संघ आणि महाराष्ट्राच्या युवांबद्दल, सर्वसामान्यांना बद्दल काही बोललात तर याद राखा’, असे म्हणत रोहित पवारांनी शिरसाटांना आव्हान दिले होते.

मातोश्रीवर तुमच्यासमोर झुकत होतो का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उपरोधिक सवाल…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खाली घसरल्याचे दिसून येत आहे. राजकारणात वाद-विवाद असणे इथपर्यंत ठिक आहे पण आरोप-प्रत्यारोप करताना एकमेकांचा एकेरी उल्लेख करणे किंवा चारित्रहनन करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे काल एकमेकांना आव्हान देणारे रोहित पवार आणि संजय शिरसाट यांच्यातील मनोमिलनाचे चित्र आश्वासक मनायला हवे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube