मुंबई : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. याच शेती पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा आणखीच घसरलाय. त्यामुळं थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय. गारठा वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. आजपासून (दि. 21) संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते […]
बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या […]
बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय. परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय […]
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.