- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
थंडीत झटपट एनर्जीसाठी प्या गुळाचं पाणी, जाणून घ्या विविध फायदे
मुंबई : हिवाळ्यामध्ये गूळ खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, गूळ इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास देखील मदत करते. त्यात कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात गूळ खाण्याचा आणखी एक अतिशय आरोग्यदायी मार्ग म्हणजे ते गरम पाण्यात मिक्स करणे. हिवाळ्यात सकाळी कोमट पाण्यात गूळ टाकून पिल्याने झटपट एनर्जी मिळते. […]
-
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मिळणार ‘एवढं’ विद्यावेतन
नागपूर : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणारय. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यात आता मोठी वाढ होणार असून 500 रुपयांचं विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास […]
-
‘हेच’ संघाचे संस्कार का? सामनातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का? […]
-
कुलू-मनालीत पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील सुरज शहाचा मृत्यू
कुलू : हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पॅराशूटचा बेल्ट निसटून झालेल्या अपघातामुळं साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सुरज शहा असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळं शिरवळ शहरावर शोककळा पसरलीय. सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी […]
-
अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार? ‘आदित्य’वरील आरोपांनंतर ठाकरे गट आक्रमक
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतो आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणारंय. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार असल्याचं दिसून येतंय. […]
-
‘ती’ महिला दाऊद गँगशी संबंधित, प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करा : राहुल शेवाळे
मुंबई : आपल्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी आपल्याला त्या महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. संबंधित महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचंही शेवाळे यांनी सांगितलंय. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची एनआयएच्या […]
-
आज पंतप्रधान मोदी करणार 2022 वर्षातील शेवटची ‘मन की बात’
नवी दिल्ली : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसचं औचित्य साधत देशबांधवांना ‘मन की बात’ कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचं आवाहन केलं होतं. आज होणारा मन की बातचा कार्यक्रम यंदाचा म्हणजे 2022 वर्षातील शेवटचा भाग असणार असणार आहे. 2022 ची शेवटची ‘मन की बात’ या महिन्याच्या 25 […]
-
संभाजीराजेंची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार टीका, अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी
नांदेड : संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकारसह विरोधकांवर निशाना साधला. शुक्रवारी शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य संभाजीराजे छत्रपती महाराजांनी केले. हिवाळी अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी असल्याची जोरदार टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या दोन दिवसीय नांदेड […]
-
कसोटीत टीम इंडिया संकटात! विजयासाठी 100 धावांची गरज
ढाका : शेरे बांगला स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियानं चार विकेट गमावून 45 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 100 रणांची गरज आहे. बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली. शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे झटपट आऊट झाल्यानं टीम इंडिया अत्यंत […]
-
‘भारत जोडो यात्रा’ थांबवण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोविड प्रोटोकॉलविषयी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. आरोग्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भारत जोडो यात्रा पाहून मोदी सरकार जळत आहे. सर्वसामान्यांचं लक्ष वळवण्यासाठी ते अनेक समस्या निर्माण करताहेत. भाजपला […]










