नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची तीव्रता मोजली असून याची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे सांगितले. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने […]
नवी दिल्ली : नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात झाल्याचं पाहायला मिळतंय. अबालवृद्धांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं. आजपासून म्हणजेच या नवीन वर्षात अनेक व्यावसायिक क्षेत्रांत काही बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट आपल्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँकिंग, विमा, पोस्ट ऑफिस आदी अनेक क्षेत्रांत मोठे बदल होणार आहेत. याचा […]
नवी दिल्ली : 31 डिसेंबरच्या रात्री देशभरात नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये करण्यात आलं. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात धुमधडाक्या करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय अनेकांनी मंदिरात जाऊन 2022 वर्षाला निरोप दिला अन् नव्या वर्षासाठी नवा संकल्प केला आहे. […]
नागपूर : तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीनं वाटप केलं आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशिम जिल्ह्यातील […]
पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज ठाकरे यांनी बुधवारी सहजीवन व्याख्यानमालेत व्याख्यान दिलं, ‘नवं काहीतरी’ असा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता. यावेळी त्यांनी व्याख्यान आणि भाषणात फरक काय असतो याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आजपर्यंत आपण अनेकदा मोठ्या ठिकाणी भाषणं केली. सभा घेतल्या मात्र व्याख्यानमालेत आणि भाषणात फरक काय असतो ते सांगतो. व्याख्यानात जरा शांत […]
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान दिलंय. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणाची घसरलेली पातळी, नगर नियोजन, राजकारण, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणपासून दूर राहणारा समाज आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. विविध गोष्टींना कसे फाटे फुटतात? प्रवक्ते कसे बोलतात, काही ऐकूच नये, पाहू नये असे वाटते. […]
नेल्लोर : आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कुंदाकुरू येथे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेवेळी चेंगराचेंगरी झाली आहे, यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक जखमीही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
नागपूर : राज्याची उपराजधानी असल्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. आजचं सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुधवारी (दि.28) सभागृहात विविध विषयांवर चर्चा झाली. गायरान जमीन प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर […]
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अनिल देशमुखांवर सुडाचं राजकारण झाल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. त्याचबरोबर अनिल देशमुख प्रकरणाचं प्रायश्चित करण्यासाठी अजित पवार यांना सरकारी विमान दिले असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेबद्दल केलेल्या प्रश्नाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, […]
नागपूर : आज महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 हे विधानसभेत बहुमताने संमत झाले. लोकायुक्त विधेयक विधीमंडळात ठेवण्यात आले होते. आज हे विधेयक बहुमतानं मंजुर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. मागील कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा नव्हता. आताच्या कायद्यात हा कायदा आणला असल्याचे फडणवीस म्हणाले. आता मुख्यमंत्री देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत. नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी […]