- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
साखरेच्या उत्पादनात भरघोस वाढ, यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज
नवी दिल्ली : देशात सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झालीय. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं समजतंय. देशातील विविध राज्यात साखरेचं मोठं उत्पादन झालं आहे. त्यामुळं […]
-
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि धर्मरक्षकही : श्रीमंत कोकाटे
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच त्याबरोबरच धर्मवीर देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं त्यांनी रक्षण केलं. त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिलं. ते स्वराज्यरक्षक जसे होते, तसे धार्मिक परंपरांना माननारे देखील होते, त्यामुळं ते धर्मरक्षक देखील होते, असे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आपल्याकडील काही इतिहास अभ्यासकांनी छत्रपती […]
-
म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अर्ज करणं झालं आणखी सोपं
मुंबई : म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणारंय. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणारंय. गुरुवारी 5 जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणारंय. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी […]
-
संजय गायकवाड पातळी सांभाळून बोला, अमोल मिटकरींचा इशारा
अकोला : राज्यामध्ये सध्या संभाजी महाराज यांचा मुद्दा गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी अमोल मिटकरी यांना उद्देशून मला छत्रपती संभाजी महाराज यांचा काही संबंध नाही, यांच्या घराण्याचा काही संबंध नाही त्यामुळं त्यांनी संभाजी राजांवर काही बोलू नये, अशी टीका संजय गायकवाड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केली आहे. आज त्यावर आमदार मिटकरी […]
-
खासदार अमोल कोल्हे पण म्हणतायत संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील काही दाखल्यांसह संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण पुरतं ढवळून निघालंय. भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी अजित […]
-
धक्कादायक! येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा एकाच दिवशी मृत्यू; कुटुंबीयांना संशय
पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैदेत असलेल्या तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मृत झालेल्या कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद ही पोलिसांनी अकस्मात म्हणून केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे […]
-
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे विरोधकांना जाऊन मिळाले : जे.पी. नड्डा
चंद्रपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे विरोधकांबरोबर जाऊन मिळाले. अशा लोकांना तुम्ही माफ करणार आहात का? असा सवाल चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डी यांनी उपस्थितांना विचारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव बंद केले. […]
-
भाजपनं राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींना डावललं, भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
संभाजीनगर : भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपनं मिशन 144 ची सुरुवात केलीय. आजपासून या मिशनला सुरुवात होणारंय. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येताहेत. संभाजीनगरमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होणार आहे. दुसरीकडं मात्र, मराठवाड्यातून होणाऱ्या या मिशनमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे […]
-
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज संभाजीनगरमध्ये, जाहीर सभेचं आयोजन
संभाजीनगर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. नड्डा यांची संभाजीनगरमध्ये संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा देखील होणार आहे. त्यांच्या या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच सभेतून नड्डा हे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नड्डा यांचा हा छत्रपती संभाजीनगर मधील पहिलाचं […]
-
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट, पुढील काही दिवस थंडी राहणार
मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देशभरात थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय. आगामी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. थंडीच्या तडाख्यानं महाराष्ट्रही चांगलाच गारठलाय. उत्तरेकडून दक्षिणेकडं वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळं वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीची लाट पसरल्याचं दिसून आलं. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची थंडी पडल्याचं पाहायला […]










