मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आगामी सीनेट निवडणुकीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केलीय. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. त्यामुळं आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी अमित ठाकरे पुढे सरसावले आहेत. आदित्य […]
पुणे : वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं दोन धावांनी विजय मिळवला. यासह तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतानं 1-0 नं आघाडी घेतलीय. आज पुण्यात दुसरा टी 20 सामना होत आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. पहिल्या टी 20 […]
बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झालाय. रामदुर्ग तालुक्याच्या चिंचनूर गावाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झालाय. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. देवीच्या दर्शनासाठी पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. नागमोडी रस्त्यामुळं ताबा सुटून वाहन […]
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. हे मंदिर पुढील आठ दिवस बंद असणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय. येथील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. […]
मुंबई : राज्यात थंडीचा जोर कायम असतानाच दुसरीकडं काही भागात पावसानं हजेरी लावलीय. सध्या वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसताहेत. त्यामुळं कधी थंडी तर कधी पाऊस असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र चांगलाच धास्तावलाय. या पावसामुळं हातातोंडाशी आलेलं पीक वाया […]
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारनं तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी अशाच प्रकारची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका स्कुटीचालक महिलेला ट्रकनं धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलाय. अपघातग्रस्त महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्यानं ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही […]
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते असे सांगितले होते, त्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना परखड उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. […]
नवी दिल्ली : देशात सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झालीय. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं समजतंय. देशातील विविध राज्यात साखरेचं मोठं उत्पादन झालं आहे. त्यामुळं […]
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच त्याबरोबरच धर्मवीर देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं त्यांनी रक्षण केलं. त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिलं. ते स्वराज्यरक्षक जसे होते, तसे धार्मिक परंपरांना माननारे देखील होते, त्यामुळं ते धर्मरक्षक देखील होते, असे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आपल्याकडील काही इतिहास अभ्यासकांनी छत्रपती […]
मुंबई : म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणारंय. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणारंय. गुरुवारी 5 जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणारंय. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी […]