- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
‘…तर एकनाथ शिंदेंबरोबर ते सर्व आमदारही अपात्र’
पुणे : सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाला आधी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले. शिवसेनेमधून आमदार बाहेर जाताना एक-एक करत गेले आहेत. नियमानुसार सगळेच आमदार एकत्र बाहेर जायला हवे होते. जे आधी 16 आमदार गेले होते, त्यांचा निर्णय आधी घ्यावा लागेल. […]
-
लवकरच मंत्रिमंडळ विस्तारासह महिला मंत्री दिसेल : अमृता फडणवीस
पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही अनुभव आहे. त्यांना माहीत आहे की, मंत्रिमंडळात कोण आहे कोण नाही. ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील आणि मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात पत्रकारांसोबत […]
-
‘अंगारकी’निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला अलोट गर्दी
पुणे : आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं गणेशाच्या दर्षणाकरता भाविकांनी गर्दी पाहायला मिळतेय. आज अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरास विविध प्रकारच्या फुलांची आरास करण्यात आलीय. दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आलाय. पहाटे 4 […]
-
राज्याला आणखी हुडहुडी भरणार, ‘या’ जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढणार
मुंबई : राज्यातील काही भागात थंडीमुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. राज्यभरात येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात हुडहुडी भरणार आहे. थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठलाय. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत […]
-
पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार, कुस्तीप्रेमींची गर्दी
पुणे : आजपासून पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 900 हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेतला. ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केलाय. मात्र या […]
-
आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस
मुंबई : आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? हे देखील पाहावं लागणार आहे. आधी दोन न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर न्यायालयानं विनंती मान्य केल्यास सात न्यायमूर्तींचं बेंचसमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. […]
-
शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. यातील तीन मतदार संघांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. आज […]
-
संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांना निलेश राणेंचं तिखट उत्तर, ट्वीट करत मोठा गौप्यस्फोट
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील वाद काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसेनात. दोन्ही नेते रोज एकमेकांवर जहरी टीका करताना दिसताहेत. आता संजय राऊत यांनी आपण नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कधीच भेटलो नाही, असा दावा शनिवारी केलाय, त्यावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी एक फोटो […]
-
गुलाबराव ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? मुख्यमंत्र्यांनीचं केलं उघड
जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहित असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. ते पाचोऱ्यात बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी […]
-
वाढत्या थंडीचा पशुपालक शेतकऱ्यांना फटका, लम्पीनं ग्रासलेल्या जनावरांना विविध रोगांची लागण
मुंबई : राज्याच्या विविध भागात आठवडाभर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झालीय. त्यानंतर लम्पीमुळं आधीच हैराण झालेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीनं विविध आजारांची लागण झाल्याचं पाहायला मिळतंय. जनावरांमध्ये तोंडखुरी आणि पायखुरी असे विषानूजन्य आजार होत आहेत. लम्पीसोबतच इतर आजारांना ही जनावरं बळी पडताना दिसताहेत. त्यामुळं पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं […]










