नाशिक : विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अखेरपर्यंत कमालीची गुप्तता बाळगल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. […]
चंद्रपूर : नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एका व्यक्तीनं लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धवने यांनी मारहाण करत असलेल्या व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 […]
बुलढाणा : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. त्यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी आमदार बच्चू कडू यांचा अपघात […]
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर अनेक उद्योग गुजरातला गेल्यानं विरोधकांनी सरकारविरोधात आवाज उचलला होता. राज्यातून गेलेली गुंतवणूक चर्चेचा विषय बनलाय. आता 16 जानेवारीपासून दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होतेय. या परिषदेला देशातील सर्वच राज्यांचे प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जाताहेत. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येताहेत. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]
लातूर : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस नेते अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय. आमदार निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. आपला राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलंय. ते भाजप युवा मोर्चाच्या […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय. राजकीय हाडवैरी असलेले भाजप […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी संयुक्त किसान मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झालाय. येत्या प्रजासत्ताकदिनाला म्हणजेच 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलीय. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारीला महाराष्ट्रात शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभागी […]
पुणे : सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाला आधी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले. शिवसेनेमधून आमदार बाहेर जाताना एक-एक करत गेले आहेत. नियमानुसार सगळेच आमदार एकत्र बाहेर जायला हवे होते. जे आधी 16 आमदार गेले होते, त्यांचा निर्णय आधी घ्यावा लागेल. […]
पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही अनुभव आहे. त्यांना माहीत आहे की, मंत्रिमंडळात कोण आहे कोण नाही. ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील आणि मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात पत्रकारांसोबत […]
पुणे : आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं गणेशाच्या दर्षणाकरता भाविकांनी गर्दी पाहायला मिळतेय. आज अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरास विविध प्रकारच्या फुलांची आरास करण्यात आलीय. दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आलाय. पहाटे 4 […]