पुणे : ‘जी-20’ बैठकीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-20 प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय […]
कोल्हापूर : ईडीनं काही दिवसांपूर्वी मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. रजत प्रायव्हेट आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरुन 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काहीच बोलत नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट […]
मुंबई : दावोसवरुन काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. पण तुमच्या नाकासमोरुन जे प्रकल्प पळवून नेलेत, ते आधी परत आणा, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर केलाय. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणं माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. […]
मुंबई : महानगरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. भारतीय हवामान विभागानुसार, मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गेल्या आठवड्यामध्ये वर्तवलाय. त्यानुसार, मुंबईतील तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही […]
अहमदनगर : बीडला निघालेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आले. तेथून ते हेलिकॉप्टरने बीडला गेले. तेथे काही वेळ त्यांनी पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाजूला जाऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजला नसला तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की […]
सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसत असल्याचं मत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केलं. यंदा मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाजही हिरेहब्बू यांनी व्यक्त केलाय. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा रविवारी रात्री संपन्न झालाय. होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री मानाचे सातही नंदीध्वज डॉ. […]
पुणे : आजपासून म्हणजेच दि. 16 व 17 जानेवारी रोजी आयोजित जी-20 बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे 38 प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. रविवारी आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-20 समुहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि […]
पुणे : येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षे या पैलवानानं पटकावलीय. अखेरच्या सामन्यात शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच चितपट करुन महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय. पण दुसरीकडं सोशल मीडियावर एक वेगळ्याच चर्चांना उधान आलंय. पैलवान सिकंदर शेखवर अन्याय […]
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हा कॉल एका सराईत गँगस्टरनं केला आहे. सध्या तो बेळगाव तुरुंगामध्ये कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडील फोनच्या माध्यमातून त्यानं कॉल केल्याचं समोर आलंय. त्यामुळं तुरुंग प्रशासनाचा अनागोंदी कारभार देखील यानिमित्तानं समोर आलाय. तुरुंगात कैद्याकडं मोबाईल फोन कसा काय […]
मुंबई : दोन वर्षांनंतर मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झालीय. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. आज होत असलेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गाड्यांची […]