अहमदनगर : नाशिक (Nashik) आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी (Ahmednagar District) आणि पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांना अटक करुन 1 फेब्रुवारीला आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगानं (Central Scheduled Tribes Commission) राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. वेठबिगारीसाठी एक मेंढी आणि पाच हजार रुपयांच्या बदल्यात मुलांच्या विक्रीप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील चारही […]
मुंबई : आज (दि.23) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार आहे. आजच्या घडीला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळं तेथील निर्णय आल्यानंतर आगामी रणनीती ठरवली जाणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये निवड झाली, ती आज संपणार आहे. यामधील काळात […]
नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना (Dhirendra maharaj) पुन्हा एकदा आव्हान दिलंय. महाराजांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं 30 लाख रुपयांच्या बक्षिसाचं आव्हान दरबारात नाही, तर नागपुरात पत्रकार आणि पंचसमितीच्या समक्ष स्वीकारण्याचं आव्हान दिलंय. धीरेंद्र महाराज यांनी त्यांचे दावे सिद्ध केल्यास मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवून माफी […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाचा एबी फॉर्म (AB Form) मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्यांना कॉंग्रेसकडून दोन कोरे एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. नाना […]
जळगाव : जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजप आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी निषाणा साधलाय. राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप खडसे यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे. एकीकडं बेरोजगारी, बेकारीचं प्रमाण […]
पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीत जे काय व्हावं ते नियमानुसार, लोकशाहीमध्ये कायद्यानुसार निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन […]
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या अती बोलण्यामुळं मी ठरवलंय की, काय वाट्टेल ते झालं तरी चालेल पण दापोली-खेडमधील पुढचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच करायचा असा निर्धार ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केला आहे. आपण रामदास कदम यांचं राजकीय ऑपरेशन (Political Operation) करणार असल्याचं यावेळी सांगितलं. […]
पुणे : राज्यात सध्या एका पक्षात दोन गट जरका पडले तर कोणत्या गटाला चिन्ह द्यायचं? हा प्रामुख्याने प्रश्न आहे. तो निर्णय निवडणूक आयोगानं घेऊ नये. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत आधीपासून एक सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय दिला तर तो कदाचित चुकीचा ठरेल, असे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि घटना अभ्यासक […]
जळगाव : महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शुभांगी पाटील यांनी आज जळगावमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याचबरोबर मुक्ताईनगमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांची भेट घेतली. यावेळी नाथाभाऊंनी केलेल्या अनोख्या स्वागतानं त्यांना गहिवरून आल्याचं पाहायला मिळालं. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांची भेट […]
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale)यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले […]