- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
विश्वजीत कदम जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, वेगळ्याच कनेक्शनची चर्चा
पुणे : राज्यातील राजकारणात पुण्यातील एका घटनेनं चर्चांना उधान आलंय. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे मातब्बर आणि निष्ठावंत नेते विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं गाडीतून आले, असं असतानाही त्यांच्याकडं कानाडोळा करुन विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. याच्यामागचं नक्की काय कारण असावं? […]
-
पाच राज्यांत थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरला
नवी दिल्ली : देशातील वातावरण सातत्यानं बदलताना दिसतंय. कुठे थंडी तर ढगाळ वातावरण जाणवतंय. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठलाय. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांसाठी थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद […]
-
पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेनं पटकावला हिंदकेसरी किताब, नवा पराक्रम
पुणे : तेलंगणा राज्यामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटकेनं बाजी मारलीय. अभिजीतनं हरियाणाच्या सोमवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवलाय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटकेनं यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. अभिजीतनं जिंकलेला हिंदकेसरी किताब महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारी आणि तेवढीच अभिमानाची गोष्ट आहे. […]
-
‘महाराष्ट्रात एवढे प्रश्न, पण नुसतीच निष्फळ बडबड’
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. महाराष्ट्रात सध्या जे सुरु आहे, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्यं केली जात आहेत. महाराष्ट्रात एवढे मोठे प्रश्न असताना नुसतीच निष्फळ बडबड केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहेत. कोणी कशावरही बोलायला लागलंय. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय, अशी […]
-
राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची खोचक टिपण्णी
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदानं पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टिपण्णी केलीय. पवार म्हणाले, ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत, अशी प्रतिक्रीया दिलीय. आज रविवारी (दि.8) ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर […]
-
हातात सत्ता असताना पाय जमिनीवर ठेवायचे असतात : शरद पवार
कोल्हापूर : सत्ता हातामध्ये असताना जमिनीवर पाय ठेवायचे असतात. पण सध्याच्या राज्यकर्त्यांकडून ते होताना दिसत नसल्याचं दिसून येतंय. त्यांच्याकडून विरोधकांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जातेय, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय. ते रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दीक युद्ध […]
-
राजधानी दिल्ली गारठली, कडाक्याच्या थंडीसह धुक्याची चादर
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात वातावरणात सातत्यानं बदलत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याचं दिसून येतंय. देशाची राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढलाय. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 3 अंशावर गेला आहे. एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरलीय. दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. थंडीमुळं तेथील […]
-
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सूर्या ठरला ‘हिरो’
राजकोट : भारत विरुद्ध श्रीलंका तीसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलाय. या सामन्यात भारतीय संघानं 91 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकानं आपल्या खिशात घातलीय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत विजयश्री खेचून आणलाय. भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. त्यामध्ये संघानं 229 धावांचं तगडं […]
-
शिंदे-फडणवीस सरकारला आमदार संजय गायकवाडांकडून घरचा आहेर
बुलढाणा : अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सहा महिने उलटूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळं विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्यानं टीका केली जातेय. आता शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर परखड भाष्य केलंय. ते म्हणाले की, आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ […]
-
शिंदेंनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर राऊत खासदार नसते : गुलाबराव पाटील
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, आमच्यावर टीका खूप टीका केली जात आहे. संजय राऊत आमच्यावर सातत्यानं टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता दाढीवर हात फिरवला असता तरी संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते, अशी […]










