दुचाकीचालक महिलेला ट्रकची भीषण धडक; तीन किलोमीटर नेलं फरफटत अन् पुढे…

दुचाकीचालक महिलेला ट्रकची भीषण धडक; तीन किलोमीटर नेलं फरफटत अन् पुढे…

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारनं तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी अशाच प्रकारची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका स्कुटीचालक महिलेला ट्रकनं धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलाय.

अपघातग्रस्त महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्यानं ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही जळून खाक झाली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवलाय. संबंधित महिला एका विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होती.

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बीके गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव पुष्पा असून त्या विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होत्या. अपघातग्रस्त महिला घरातील काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी स्कूटरवरून जाताना ट्रकनं त्यांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रकनं पीडितेला तीन किलोमीटरपर्यंत ओढत नेलं.

यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला पण चालक थांबला नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पीडित महिला मूळच्या लखनऊ येथील रहिवासी होत्या. ट्रकच्या डंपरमधून त्यांचा मृतदेह काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी चालक फरार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube