एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत आहे तर, तिला मिळणाऱ्या मानधनावरून इंदुरीकर महाराज आक्रमक झाले आहेत. त्यात आता गौतमी पाटीलसाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मैदानात उतरल्या आहेत.
इंदुरीकर महाराज म्हणाले असं की तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. पण इंदुरीकर महाराज असो की गौतमी पाटील. नक्की किती मानधन घेतात. या व्हिडिओतून जाणून घेऊ
एप्रिल 2023 या नव्या अर्थिक वर्षात आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये काय-काय बदल होणार आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण पाहा…
काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होतील का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होणे शक्य आहे का? त्याचे फायदे-तोटे काय? या विषयांचा आढावा घेण्यासाठी लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी वरीष्ठ पत्रकार संजय मिस्कीन आणि किशोर आपटे यांच्यासोबत बातचीत केली. Can Lok Sabha & Assembly Elections be held simultaneously?
सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं. विरोधकांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे, असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे.
‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाचे बारामती येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे चे नामांतर ‘धाराशिव’ करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजूरी दिली. दोन शहरांचं नामांतर झालं असलं तरी याच्या नामांतराच्या लढ्याला एक मोठा इतिहास आहे सोबतच शहराच्या नावाचाही मोठा इतिहास आहे. हाच इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह भविष्यात एकत्र दिसणार का? असा प्रश्न लेट्सअप सभेत विचारण्यात आला असता खासदार ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.