आगामी राजकीय वाटचाल, भारत जोडो यात्रा आणि सिटीझनविल पुस्तक यासह विविध मुद्द्यांवर कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी दिलखुलास मुलाखत दिली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कसबा आणि चिंचवडसाठीचे आपले उमेदवार ठरले आहेत. यानुसार काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. एकंदरीत या निवडणुकीत अजित पवार यांनी शिवसेनेचा नेता आपल्याकडे खेचत भाजप समोर मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. धंगेकर यांनी यापूर्वी देखील कसब्यामध्ये निवडणूक लढवली होती. राहुल कलाटे यांनीही दिवंगत […]
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झाले. यंदा या निवडणूका चांगल्याच गाजल्या. महाविकास आघाडी की भाजप मारणार? याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.याबाबत लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांचे विश्लेषण नक्की पाहा.
न्यूझीलंड विरूद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यामुळे तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर पडला आहे. निर्णायक अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरिल मिचेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडने दिलेले 177 धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. भारताला 155 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने 21 धावांनी संघाचा पराभव झाला. अष्टपैलू वॉशिंगटन […]
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दोन मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आले होते. दरम्यान जसा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हा मुख्य मुद्दा असेल. त्याच पद्धतीने राज्यात होऊ घातलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नवी मुंबई, ठाणे या प्रमुख महानगर पालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हे निवडणुकीसाठी भाजपचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. याबाबत लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी […]
नेते मंडळींनी विविध कारणांच्या निमित्ताने क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र यातील नक्की कोणाची फटकेबाजी तुम्हाला जोरदार वाटली? सांगा.
एका तिळाचे शंभर तुकडे करून चर्चेत आलेल्या पुसद येथील अभिषेक रुद्रावार याने या वर्षी एका तिळावर पतंग रेखाटली आहे. ही पतंग 0.2 एमएम आकाराची आहे.
गडाख कुटुंबातील उदयन गडाख व घुले कुटुंबातील डॉ. निवेदिता घुले यांचा विवाह होत आहे. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात कशी राजकीय सोयरिक आहे, या व्हिडिओतून पाहूया…
धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील एका शेतकऱ्यानं ॲप्पल बोरांची यशस्वी शेती करुन भरघोस उत्पन्न घेतलं आहे. कैलास रोकडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बोरं देशाची राजधानी दिल्ली आणि कोलकात्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत.