नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. यातून ऋषभ वाचला मात्र त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ऋषभच्या प्रकृतीबाबत मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. त्यानुसार पंतला सर्वाधिक जखमा डोके आणि पायाला झाल्या आहेत. यामुळे त्याचे ब्रेन आणि स्पाईनचा […]
नवी दिल्ली : 2022 मध्ये क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी निवृत्तीची घोषणा केली. वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला निरोप दिला. सेरेनाने यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर यूएस ओपन ही त्याची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा मानली गेली. या स्पर्धेतील पराभवानंतर ती रडतच कोर्टाबाहेर गेली. सेरेनाने तिच्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम एकेरी आणि तिची मोठी […]
मुंबई : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात दिसून येत आहेत. उद्धव यांचे पुत्र आदित्य आदित्य यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे गट आणि भाजप यांनी जोरदार डावपेच टाकल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेत बोलण्याची शक्यता आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाकरे मोठा बॉम्बस्फोट ते […]
नवी दिल्ली : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांत आटोपल्याने भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान आहे. मात्र अखेरच्या डावात भारताची सुरूवात अत्यंत खराब सुरूवात झाली. अवघ्या 19 धावांत भारताने सलामीची जोडी गमावली. दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 बळी टिपले. मोहम्मद सिराज आणि अश्विनने प्रत्येकी 2-2 बळी […]
नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी शनिवारी कोची येथे झालेल्या लिलावात एकूण 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या दरम्यान 80 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. कोणत्या संघानं कुणावर खर्च केले पैसे? पाहा… मुंबई इंडियन्स : कॅमरन ग्रीन (17.5 कोटी), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद […]
हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलीय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल उघडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार का? या सर्व प्रकरणाचा बिहार निवडणुकीशी काय […]
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी मात्र कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. चीनमध्ये आलेला व्हायरस नवीन व्हेरियंट नाही, असंही ते म्हणाले. डॉ. रवी गोडसे म्हणाले की, अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा. एखाद्या गुराला 3 वर्षांपासून […]
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. संजय राऊत म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे […]
नागपूर : महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुन्हा एकदा केला. याला उत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली पाहिजेत. त्यातून सीमाभागातील मराठी […]
नागपूर : कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा उपस्थित करताना […]