एका तिळाचे शंभर तुकडे करून चर्चेत आलेल्या पुसद येथील अभिषेक रुद्रावार याने या वर्षी एका तिळावर पतंग रेखाटली आहे. ही पतंग 0.2 एमएम आकाराची आहे.
गडाख कुटुंबातील उदयन गडाख व घुले कुटुंबातील डॉ. निवेदिता घुले यांचा विवाह होत आहे. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात कशी राजकीय सोयरिक आहे, या व्हिडिओतून पाहूया…
धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील एका शेतकऱ्यानं ॲप्पल बोरांची यशस्वी शेती करुन भरघोस उत्पन्न घेतलं आहे. कैलास रोकडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बोरं देशाची राजधानी दिल्ली आणि कोलकात्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘बारामतीचे चुलते, पुतणे दोघेही चोर आहेत, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यावर अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा समाचार घेतला. आता पुन्हा यावर गोपीचंद पडळकरांनीही प्रत्युत्तर देत टीका केली.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी त्यांच्याकडे कशी आली? यावरही भाष्य केलं.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक’ म्हणावं असं विधान केलं होतं. यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केलं. या विषयावर लेट्सअप मराठीचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्याशी संवाद साधला.
मुंबई : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना महावितरण कंपनी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. कंपनी आमची आहे, सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे. त्यामुळे कंपनी वाढली पाहिजे हीच भावना आमच्या आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप हेगडे यांनी दिली. प्रताप हेगडे म्हणाले, केवळ संपाने हा प्रश्न सुटणार नाही खरं म्हणजे उत्तर महावितरण कंपनीकडे आणि कर्मचाऱ्यांच्याकडेच आहे. […]
ठाणे : 2022 हे वर्ष संपायला अवघे काहीच तास उरले आहेत. 2022 अंति मोदी सरकारने आपल्याला काय-काय वायदा केला होता? त्यातील प्रमुख वायद्यांची आठवण राष्ट्रवादीने करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबत सरकारला जाब विचारताना अनेक सवाल उपस्थित केले आहे. महेश तपासे म्हणाले, या देशाचं सकल उत्पन्न दहा टक्क्यांपर्यंत 2022 अंती जाईल, ते […]
बीड : मला कुठलंच व्यसन नाही असे सांगताच विनायक मेटे म्हणाले, लोकांना दाखवून द्यायचं आहे की, व्यसन केलं नाही तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेंटेंच्या आठवणींना उजाळा दिल्या. दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी2023 नव्या वर्षातले त्यांचे प्लॅन्स जाहीर केले आहेत. दरम्यान त्यांच्या निशाण्यावर कोण असणार आहे? याची एक यादीच त्यांनी शेअर केली आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील पाच नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे […]