पुणे : राज्य सरकारने बांधकाम क्षेत्राला दिलासा दिला असून आगामी आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या दरानेच मुद्रांक शुल्क आकारणी होणार आहे. या दरात ५ ते ७ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण तसे झालेले नाही. राज्यात मुद्रांकद्वारे यंदा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा विक्रमी महसूल […]
पुणे : कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द होणार असून त्यांचा समावेश नजिकच्या महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. यासाठीचा अभिप्राय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांकडून मागविण्यात आला आहे. या कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या निवडणुका मध्यंतरी जाहीर करण्यात आल्या होत्या. पण त्या रद्द झाल्या. त्यामागचे कारण आता पुढे आले […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सर्वोच्च न्यायालयातील संघर्षाची सुनावणी अखेरीस संपली. निकाल काय लागेल, कोणाच्या बाजून लागेल यावर अनेक शक्यता व्यक्त आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारले. त्यावरून खंडपीठाचा कल कोणाच्या बाजूने यावर अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात निकालपत्रानंतरच यावरील अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत. […]
पुणे : राजकारणातील फासे कधी उलटे पडतील हे सांगता येत नाही. आपल्यालाच किंवा आपल्या निकटवर्तीयाला त्यात अडकावे लागेल का, याची शाश्वती देता येत नाही. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam Vs Anil Parab) यांना सध्या हाच अनुभव आला आहे. त्यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसाॅर्टच्या विरोधात रान पेटवले होते. […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देशभरातील व्यावसायिकांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे देशभारातील करोडो व्यावसायिकांना याचा फायदा होणार असून, यामुळे फिजिकल दुकानदार असणाऱ्या रिटेल व्यावसायिकांना व्यावसाय करणे अधिक सोयीचे होणार आहे. केंद्र सरकार लवकरच रिटेल ट्रेड पॉलिसी आणण्याच्या विचारात असल्याचे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) […]
भारताचा शेजारी देश पाकिस्तानात मोठा आत्मघाती हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत पोलिसांना लक्ष करण्यात आले असून, या भीषण घटनेत ९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने सोमवारी पोलिसांच्या गाडीला धडक दिली. यानंतर झालेल्या भीषण स्फोटात ९ पोलिसांचा मृत्यू झाला. बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटापासून साधारण 160 किमी अंतरावर असेलल्या सिब्बी शहरात हा भीषण हल्ला […]
प्रफुल्ल साळुंखे : टीम लेटस्अप मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरातून वादाची नवीन बत्ती पेटवली. ही बत्ती इतकी पेटली की विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्याची झळ बसली. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांनी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही साथ दिली. विधीमंडळाचा कोणी अपमान करत असेल तर […]
पुणे : राज्यात काॅंग्रेस पक्षाने अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मुख्यमंत्री झालेले अनेक काॅंग्रेस नेते चतुर होते. ते आपल्या मंत्रीमंडळातील काही जागा नेहमी रिक्त ठेवत आणि आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार हा लवकरच करणार असल्याचे आवर्जून सांगत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तर हा किस्सा अनेकदा पत्रकारांना सांगितला होता. आमच्या मंत्रीमंडळातील काही जागा आम्ही नेहमीच रिक्त ठेवतो. त्यामुळे […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या सकाळच्या शपथविधीवरून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात त्यावरून जुंपली आहे. हा शपथविधी शरद पवारांनी बोलून झाला होता, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आणि ऐन वेळी पाठिंबा देण्यास नकार देऊन पवारांनी विश्वासघात केला, असा आरोप […]
मुंबई : शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने आज दिला. मात्र आयोगाच्या निकालपत्रातून अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मूळची शिवसेना असल्याचे आयोगाने नमूद करताना पक्षात लोकशाही नसून नक्की बहुमत कोणाकडे आहे, हे दोन्ही गटांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट होत नसल्याने आमदार आणि खासदार यांच्या संख्येनुसारच हा निर्णय घेतल्याचे आयोगाने म्हटले आहे. […]