Ashish Vidyarthi : बॉलिवूडचे व्हिलन आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी अडकले विवाह बंधनात

Untitled Design   2023 05 25T161603.296

Ashish Vidyarthi wedding: : प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि विशेषतः खलनायकाच्या भुमिका करणारे आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी आसाममधील रूपाली बरूआ यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. कोलकातामध्ये त्यांनी कोर्ट मॅरिज केले आहे.

Sirf Ek Banda Kafi Hai Review : मनोज वाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ कसा आहे? पाहा रिव्ह्यू…

जवळचे मित्र आणि परिवारासह हे लग्न पार पडले असून त्यानंतर आता ते या कार्यक्रमाची रिसेप्शन पार्टी देखील देणार आहेत. आशिष विद्यार्थी यांचं हे दुसरं लग्न आहे. अगोदर त्यांनी राजोशी व‍िद्यार्थी यांच्याशी विवाह केला होता. तर त्यांच्या पत्नी रूपाली बरूआ या फॅशन जगताशी संबंधित असून त्या एका फ२शन स्टोअरच्या मालकीन आहेत. त्या जुन्या अभिनेत्री शकुंतला बरूआ यांच्या मुलगी आहेत.

Ashish Vidyarthi : बॉलिवूडचे व्हिलन आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी अडकले विवाह बंधनात

आशिष विद्यार्थी यांनी 11 हून अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखलं जात. विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आशिष विद्यार्थी म्हणाले, आयुष्याच्या या वळणावर विवाह करणे एक विलक्षण भावना आहे. आम्ही आज सकाळी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले आहे. त्यानंतर रिसेप्शन असणार आहे. अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube