कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम…हा खूप मोठा आशीर्वाद; आयुष्मान खुराना

कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम…हा खूप मोठा आशीर्वाद; आयुष्मान खुराना

Ayushmann Khurrana News : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचं म्हणणं आहे की, एका कलाकाराला मिळणारे जगभराचे प्रेम आणि सन्मान ही त्याच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. 2024 मध्ये आयुष्मानचे गाणे 184 देशांतील लोकांनी ऐकले. ही कामगिरी त्यांना अधिक प्रेरणा आणि कृतज्ञतेची जाणीव (Bollywood News) करून देते.

कलाकार हा कदाचित जगभरात सर्वाधिक प्रेम मिळवणारा व्यक्ती असतो. कारण त्याला सीमा, भाषा पार करून जगभरातून स्नेह मिळतो. कला लोकांना जोडते, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून बाहेर काढते आणि त्यांना आनंदाने भरलेल्या जगात घेऊन जाते. मी अभिनेता असूनही, पूर्ण वेळ संगीतकार नसतानाही, (Ayushmann Khurrana Song) माझ्या गाण्यांना 184 देशांमध्ये पोहोचताना पाहणे खूपच नम्र करणारे आहे. हे मला माझ्या चित्रपटांच्या वेळेत अधिक संगीत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते. मी आभारी आहे की, मी क्रिएटिव आर्ट्सचा भाग आहे. दररोज लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतोय, असं आयुष्मान म्हणाला.

‘अग्नी’मधून सईने पाडली अभिनयाची छाप; रुख्मिणीने जिंकलं प्रेक्षकांचं मन

अलीकडेच आयुष्मानने अमेरिकेत आपला म्युझिक टूर (Ayushmann Khurrana Movie) केला. ज्यामध्ये शिकागो, सॅन जोस, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि डलासमध्ये हाऊसफुल शो झाले. आयुष्मान प्रेक्षकांशी आणि चाहत्यांशी जोडण्याचा आनंद घेतो. त्याचे संगीत त्याला अत्यंत खास आणि जवळच्या पद्धतीने जोडण्याची संधी देते.

मोठी बातमी! विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर; आवाजी मतदानाने झाली निवड

मी एक अभिनेता, कवी आणि गायक/संगीतकार म्हणून माझ्या स्वप्नांना जगत आहे. माझी गाणी ऐकणाऱ्या आणि माझ्या कन्सर्टला येणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तुमचे पाठबळ माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि हे मला अधिक करण्यासाठी प्रेरित करते. मला आशा आहे की, तुम्ही माझे संगीत ऐकत राहाल, माझे चित्रपट पाहत राहाल आणि नेहमीच आनंद मिळवत राहाल! असंही आयुष्मान पुढे म्हणाला.

अभिनयाच्या जगात, आयुष्मान दिवाळी 2025 मध्ये मॅडॉक फिल्म्सच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या थामा या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय, ते धर्मा-सिख्या प्रोडक्शनच्या एका अनोख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल, ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube