‘अग्नी’मधून सईने पाडली अभिनयाची छाप; रुख्मिणीने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Saie Tamhankar In agni Movie : मराठमोळी सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आता बॉलीवूड गाजवत आहे. सईने काही दिवसांपूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. 2024 हे वर्ष सई ताम्हणकरसाठी बॉलिवूडमय ठरतंल, यात शंका नाही. ‘भक्षक’ या हिंदी वेब शोनंतर आता सई ‘अग्नी ‘ साठी सज्ज झालीय. (Bollywood News) प्रतीक गांधी , जितेंद्र जोशी , दिवेंद्यू , सयामी खेर अशी स्टारकास्ट असलेला ‘अग्नी ‘ प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
Redmi Note 14 सिरीज उद्या लॉन्च होणार; वॉटरप्रुफ बॉडी अन् भन्नाट कॅमेरा फिचर्स
बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी”मधून पुन्हा एकदा सईने तिच्या अभिनयाची छाप (agni Movie) पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना दिलासा; आयकर विभागाकडून जप्त मालमत्ता मुक्त
2024 हे वर्ष सईसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं. यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच, पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुडमध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात.
अग्निमधील रुख्मिणी प्रेक्षकांना भावली आहे. बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे. हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नीला वाहवा दिली आहे.