Sai Tamhankar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सईची स्वप्नपूर्ती! घरी आला नवा मेंबर…

Sai Tamhankar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सईची स्वप्नपूर्ती! घरी आला नवा मेंबर...

Sai Tamhankar Dream come true on Gudhi Padawa : २०२४ वर्षात एक उत्तम अभिनेत्री म्हणून सात्यत्याने काम करून कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सई ताम्हणकरची ( Sai Tamhankar ) अजून एक स्वप्नपूर्ती झाली आहे. असं म्हणतात ना ” स्वप्न पाहिली आणि त्या स्वप्नासाठी अपार मेहनत केली की, आपली स्वप्न सत्यात ( Dream ) उतरतात” असं काहीसं सई सोबत झालं आहे. आज गुढी पाडव्याच्या ( Gudhi Padawa ) मुहूर्तावर सईची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे.

सारे मिळून…, राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा अन् काही मिनिटांत फडणवीसांचे खास ट्वीट

कामाच्या गडबडीत असलेली सई न थांबता अनेक छान छान सरप्राईज देत असताना आज सईने अजून एक खास सरप्राईज दिलं आहे. सईने मर्सिडीज बेंझ ही नवी कोरी गाडी गुढी पाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. मेहनती असलेली सई २०२४ वर्षात बॅक टू बॅक बॉलिवुड आणि मराठी प्रोजेक्ट मधून दिसत तर आहे पण सोबतीने तिने स्वतःच हे खास स्वप्न देखील पूर्ण केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

एखाद्या गोष्टीसाठी असलेली जिद्द आणि त्यासाठी दिवस रात्र एक करून सई सध्या कामात व्यस्त तर आहे पण स्वतःह साठी सेल्फ गिफ्ट म्हणून तिने ही खास गाडी सुद्धा घेतली आहे. सई नेहमीच स्वतःच्या जोरावर काम करताना दिसली आहे. एक सशक्त अभिनेत्री ते सेल्फ मेड वुमन हा तिचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देऊन जातो.

‘उद्धव ठाकरे रोकड पक्षाचे अध्यक्ष’; ‘मोदी भेकड’ म्हणणाऱ्या ठाकरेंवर शिंदेंचा पलटवार

सईचा आजवरचा इंडस्ट्रीतील प्रवास असो किंवा वैयक्तिक आयुष्यात झालेली तिची स्वतःची प्रगती ती कायम एक सशक्त माणूस आहे यातून कायम दिसून येत. प्रत्येक गोष्ट उत्तम झाली पाहिजे हा तिचा कायम अट्टाहास असताना सई सशक्त अभिनेत्री आणि स्त्री आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. सईची नवं वर्षाची सुरुवात तर दमदार झाली आहे पण इथे न थांबता वर्षभर ती प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी देखील सज्ज आहे.

” श्री देवी प्रसन्न ” , ” भक्षक ” , ” डब्बा कार्टल ” , ” अग्नी ” , ” ग्राउंड झिरो ” आणि तिच्या प्रोजेक्ट्स ची न संपणारी विश लिस्ट ही अशीच वाढत राहणार आहे. सई साठी २०२४ वर्ष खरंच मॅनिफेस्टिंग आहे यात शंका नाही !

follow us