अभिनेत्री दिशा पटानीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री झलक, कल्की 2898 AD या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री दिशा पटानीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री झलक, कल्की 2898 AD या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Disha Patani : ‘कल्की 2898 एडी’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (Kalki 2898 AD) सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. हा ट्रेलर खूप उत्कंठावर्धक असून साय-फाय डिस्टोपियन मास्टरपीसची एक झलक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाची खूण असलेल्या या चित्रपटात अनेक उत्तम कलाकार झळकणार आहेत. (Disha Patani) यामध्ये प्रभासपासून दिशा पटानीपर्यंत प्रत्येक अभिनेत्याने ट्रेलरमध्ये आपली अनोखी छाप सोडली आहे. दिशा पटानीच्या एका झलकने तिच्या स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दरम्यान, सध्या चाहते इंटरनेटवर याचं कौतुक करताना दिसत आहेत.

क्षमता सिद्ध केली    Kalki 2898 AD सिनेमासाठी प्रभासने घेतली इतकी फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या नधनाचा आकडा 

निर्मात्यांनी दिशा पटानीच्या भूमिकेची एक झलक यातून दाखवली आहे. आता दिशाला या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अभिनेत्रीने जेव्हापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हापासून तिने एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. अनोख्या भूमिका पासून रोमान्सपर्यंत दिशाने आपल्या प्रत्येक भूमिका चोख बजावताना दिसली आहे. चाहते प्रभाससोबत तिची मैत्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रत्येकवेळी या अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर काम केलं तेव्हा तेव्हा तिने केवळ तिच्या अभिनय क्षमतेनेच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

वेलकम टू द जंगल Disha Patani: दिशा पटानी हिच्या दिलखेच लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

‘कल्की 2898 एडी’ व्यतिरिक्त दिशा पटानी काही आगामी चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. ती ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात काम करणार अजून, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ज्यामध्ये ती अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि इतर अनेक कलाकारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसंच, तिच्याकडे सुर्या स्टारर ‘कंगुवा’ हा चित्रपट देखील आहेत. हे चित्रपट घेऊन ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज