Ileana Dcruz: लग्न न करताच गरोदर झाली इलियाना डिक्रूझ; गरोदरपणाची घोषणा करत म्हणाली…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T112456.588

Ileana D’cruz : टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana Dcruz) चाहत्यांना गोड बातमी दिली. लग्न न करताच इलियानाने प्रेग्नन्सी जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.

तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असते. तर आता तिच्या एका पोस्टने सर्व चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वळवले आहे. ती आई होणार असल्याचे तिने तिच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवरून जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा (Katrina Kaif) भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याची चर्चा रंगत होती ‘कॉफी विथ करण सीझन ७’(Koffee With Karan Season 7) मध्ये करणने याविषयी मोठा खुलासा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)


इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केले नाही. यानंतर आता इलियानाने आई होण्याची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इलियानाने आज सकाळी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये बाळाचे कपडे दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘ममा’ असं लिहिलेली एक चेन दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे,

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

“कमिंग सून… तुला भेटण्याची मी आणखीन वाट बघू शकत नाही, माय लिटिल डार्लिंग.” पण अशी पोस्ट शेअर करत इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांची ओळख देखील आजून सांगितली नाही. इलियानाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण? हे जाणून घेण्यासाठी तिथे चाहते मोठे उत्सुक झाले आहेत. आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते, मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube