इतक्या रात्री लग्नासाठी तिला पाहून पुजारी अवाक; अभिनेत्री रेखाच्या लग्नाचा ‘तो’ किस्सा समोर

इतक्या रात्री लग्नासाठी तिला पाहून पुजारी अवाक; अभिनेत्री रेखाच्या लग्नाचा ‘तो’ किस्सा समोर

Actress Rekha : बॉलिवूड अभिनेत्री जीने 70 ते 90 च्या दशकात (Rekha) तिने चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले. उत्कृष्ट अभिनयाबरोबरच ती नृत्यातही अप्रतिम होती. तिच्या सौंदर्यानेही ती नेहमी चर्चेत राहिली ती अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये रेखाने अनेक वर्षे काम केलं आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य केलं. जरी ती आता बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी रेखा असं व्यक्तिमत्त्व आहे जे चित्रपट विश्वातून वजा करता येणार नाही. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यानेही नेहमी सर्वांचं लक्ष वेधलं होते. तिची अनेक प्रेमप्रकरणे झाली. लग्नही केलं. मात्र, तिचं लग्न यशस्वी झालं नाही. तिच्या लग्नाशी संबंधित एक रंजक किस्सा सध्या चर्चेत आहे.

माजी पीएकडूनच आलियाच्या अकाउंटवर डल्ला! 76 लाखांच्या फसवणुकीसाठी वेदिका शेट्टीला अटक

रेखाचं नाव कधीकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं गेलं होतं. नंतर दोघं वेगळं झाले. त्यानंतर असंही म्हटलं जातं की तिने दिवंगत अभिनेता विनोद मेहरा यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, हे नातंही टिकलं नाही. त्यानंतर रेखाने 1990 मध्ये दिवंगत उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं.

पत्रकार आणि लेखक यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या “रेखा: द अनटोल्ड स्टोरी” या पुस्तकात रेखाच्या आयुष्यातील अनेक रंजक किस्से आहेत. यात तिच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख आहे आणि मुकेश अग्रवाल यांच्याशी झालेल्या लग्नाचा किस्सा देखील आहे. या पुस्तकानुसार, 4 मार्च 1990 रोजी रेखाने मुकेश यांच्याशी लग्न केले.

दोघंही लग्नासाठी मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात गेले होते. पण तेव्हा खूप रात्र झाली होती. असं म्हटलं जातं की, तेव्हा मंदिराचे पुजारी संजय बोडस झोपले होते. पण मुकेश यांनी पंडितांना उठवलं आणि सांगितलं की ते लग्नासाठी आले आहेत. रेखाला पाहून पुजारी थक्क झाले.

रेखा त्या मंदिरात नेहमी येत असली, तरी इतक्या रात्री लग्नासाठी तिला तिथे पाहून पुजारी अवाक झाले. त्यानंतर त्यांनी रेखा आणि मुकेश यांचे लग्न लावलं, जे रात्री साडेदहा वाजता झालं. पण लग्नानंतर काही महिन्यांतच 1990 मध्ये मुकेश यांनी आत्महत्या केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube