माजी पीएकडूनच आलियाच्या अकाउंटवर डल्ला! 76 लाखांच्या फसवणुकीसाठी वेदिका शेट्टीला अटक

Alia Bhats account hacked by former PA Vedika Shetty arrested for fraud of Rs 76 lakhs : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhat) तब्बल 76 लाखांची फसवणुक झाली आहे. विशेष म्हणजे ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे. त्या प्रकरणात आता वेदिकाला जुहू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. मात्र याबबात आलियाच्या टीमकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
नेमकं प्रकरण काय?
आलिया भटची (Alia Bhat) माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका शेट्टीला आलिया भटच्या प्रोडक्शन हाऊस इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच आलियाच्या पर्सनल अकाउंटवरून खोट्या सह्या करून पैसे काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदिकांनी या दोन्ही खात्यातून तब्बल 76 लाखांहून अधिक रक्कम अवैधरीत्या काढले आहे. या बाबत आलियाची आई सोनी राजदान यांनी पाच महिन्या पूर्वीच तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Sanjay Gaikwad : अनिल परबांनी रान पेटवताच फडणवीसांनी अंग काढून घेतलं, अधिवेशनात नेमकं काय घडलं?
‘एटरनल सनशाइन प्रोडक्शन’ आलिया भटने (Alia Bhat) 2021 मध्ये स्थापन केलं आहे. आलियाच्या या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग्स’ होता.जो शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत को-प्रोड्यूस केला होता. यामध्ये आलिया भट, विजय वर्मा आणि शेफाली शाहने महत्त्वाच्या भुमिका साकारल्या होत्या.