तमन्ना भाटिया अन् विजय वर्मा चढणार बोहल्यावर; कुटुंबियांच्या दबावामुळे अभिनेत्री थाटणार संसार

तमन्ना भाटिया अन् विजय वर्मा चढणार बोहल्यावर; कुटुंबियांच्या दबावामुळे अभिनेत्री थाटणार संसार

Tamannaah Bhatia-Vijay Varma Marriage: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) या कपलची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. सध्या हे बॉलिवूडमधील चर्चेतील कपल आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या डेटिंगच्या चर्चानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र या कपलने अद्याप आपल्या नात्याबद्दल काही सांगितलं नाही. हे कपल सोशल मीडियावर देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेक दिवाळी पार्ट्यांमध्ये एकत्र बघायला मिळाले आहेत. आता या सगळ्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. हे कपल लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चा होण्यामागचे खरं कारण देखील समोर आलं आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहेत. अशामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी लग्न करावे असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. ते या कपलच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच एक मीडियाच्या माहितीनुसार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. तमन्ना आणि विजयचे कुटु्ंबींय लग्नासाठी दोघांनाही प्रेशराइज करत असल्याची माहिती समोर आहे.

‘ऐश्वर्याबद्दल घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मागितली माफी

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लग्नाबद्दल आता खूप गंभीर आहेत. आता ते त्यांच्या नात्याला नवे वळण देण्याचा विचार करणार आहेत. तमन्ना भाटियाचे वय 30 पेक्षा जास्त आहे. यामुळे तिचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. तर लग्नासाठी विजयवर देखील कुटुंबीयांकडून दबाव टाकला जात आहे.

हिंदी मनोरंजनसृष्टीतील फेमस कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. मात्र जेव्हा या दोघांनी ‘लस्ट स्टोरीज 2’ या वेबसीरिजमध्ये एकत्र काम केले त्यावेळेस त्यांच्या नात्याच्या खूपच चर्चा रंगल्या आहेत. ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी एकत्र अनेक बोल्ड सीन्स दिले होते. ज्यांची या दोघांची चर्चा रंगली होती. या वेबसीरिजनंतर तमन्ना आणि विजय अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. ऐवढेच नाही तर दोघेही सोशल मीडियावर एकत्र रोमँटिंक फोटो शेअर करत असताना दिसत असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube