Al Pacino : ‘गॉडफादर’ फेम अभिनेता 83 व्या वर्षी झाला बाबा; 29 वर्षीय गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म
Al Pacino Became Father At 83 : हॉलिवूड अभिनेता अल्फ्रेडो जेम्स पचिनो उर्फ अल पचिनो सध्या तो जोरदार चर्चेत आला आहे. (Al Pacino) अभिनेत्याने वयाच्या 83 व्या वर्षी आपल्या चौथ्या मुलाचे स्वागत केले आहे. (Noor Al Fallah) मिळालेल्या माहितीनुसार अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहने वयाच्या 29 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे.
अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर ही प्रेग्नंट असल्याची बातमी गेल्या काही दिवसापासून चांगलीच गाजत होती. अल आणि नूरने त्यांच्या लाडक्या मुलाचे नाव रोमन पचीनो असे ठेवले आहे. सध्या अल पचिनो यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अल पचिनो आणि नूर अल्फल्लाहन २०२२ मध्ये एकमेकांना डेट करत असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये व्हेनिसमधील फेलिक्स ट्रॅटोरिया येथील एका हॉटेलमध्ये दोघांना पहिल्यांदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
या इटालियन हॉटेलमधील डिनसर डेटनंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली होती. अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर ही एका कुवेती अमेरिकन कुटुंबातील कन्या आहे. अच पचिनो याअगोदर तिचं नाव ७८ वर्षीय लोकप्रिय गायक मिक जेगर यांच्याबरोबर जोडले गेले होते. यानंतर तिचे नाव ६० वर्षीय निकोलस बर्गग्रेन यांच्याबरोबर जोडले होते. यानंतर ती ९१ वर्षीय सिने-निर्माते क्लिंट ईस्टवुडबरोबर एकत्र स्पॉट झाली होती.
अल पचिनो नूर अगोदर जॉन टेरंटला डेट करत होता. त्यावेळी त्यांना ज्युली नावाची एक मुलगी झाली होती. ज्युली आता ३३ वर्षांची आहे. यानंतर १९९७ ते २००३ या दरम्यान अल पचिनोने डेव्हरली डी एंजेलोला डेट करत असल्याची चर्चा रंगली. बेव्हरली डी’एंजेलो आणि अल पचीनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुले झाले. ही मुलं आता २२ वर्षांची आहेत.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
दरम्यान अल पचिनो यांनी आता चौथ्या मुलाचे स्वागत केले आहे. अमेरिकन अभिनेता अल पचिनो हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने सिनेमा, सिरीयल आणि नाटकांसह अनेक माहितीपटांमध्ये काम केले आहे. विनोदवीर म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘द आयरिशमॅन’, ‘द गॉडफादर’,’द डेविल्स एडवोकेट’ आणि ‘सेन्ट ऑफ अ वुमन’ या सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये अल पचिनोने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.